Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ४ मे, २०२२

शिंदखेडा तहसीलदार यांच्या विरोधात त्यांच्या धर्म पत्नीचे उपोषण मागे




शिंदखेडा येथील तहसीलदार सुनील सैंदाणे यांच्या विरोधात त्यांच्या पत्नी वैशाली सैंदाणे यांनी तहसील कार्यालयाच्या बाहेर उपोषण सुरू केले . पत्नी आणि मुलांविषयी खोटे दस्तऐवज बनवून शासनाची फसवणूक केल्याने तहसीलदार सुनील सैंदाणे यांना सेवेतून बडतर्फ करावे यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केले.जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन केले जाईल असा निर्धार वैशाली सैंदाणे यांनी केला आहे.

पत्नीमध्ये असलेला वाद शहरासह परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. शिंदखेडा येथे सुनील सैंदाणे काही वर्षांपासून तहसीलदार म्हणून आहे. त्यांच्या पत्नी वैशाली सैंदाणे यांनी केलेल्या आरोपानुसार सुनील सैंदाणे यांच्याशी त्यांचे २४ वर्षांपूर्वी लग्न झाले. सुनील सैंदाणे यांच्याकडून न्यायालयाच्या आदेशानुसार दरमहा १५ हजार रुपये मिळतात.ही रक्कम अत्यल्प आहे.सुनील सैंदाणे यांनी मुलांच्या शिक्षणासह त्यांच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी वैशाली सैंदाणे यांनी केली आहे.
 
या आंदोलनाची दखल घेत प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांनी सायंकाळी उपोषणकर्त्यांची भेट घेतली.या वेळी त्यांच्याशी चर्चा करून तहसीलदार सुनील सैंदाणे यांच्यावर कारवाईबाबत प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवू असे सांगण्यात आले.तसेच पंधरा दिवसांत त्यांच्यावर कारवाई करू असे आश्वासन दिले.या आश्वासनानंतर वैशाली सैंदाणे यांनी उपोषण मागे घेतले.पंधरा दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन करू असे इशारा देण्यात आला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध