Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १६ मे, २०२२

चोरवणे गावचे प्रथम सरपंच कृष्णा गोविंद शिंदे यांचे दुःखद निधन



अशी माणसे जन्मा येती कायम स्मृती ठेवुनी जाती

खेड:सुदर्शन जाधव/अक्षय कदम:
आईच्या उदरातून मनुष्य देह जन्माला येतो,लहानाचा मोठा होतो,हळूहळू मोठा होता,अज्ञानातून ज्ञानी बनतो.कोण पैशाने श्रीमंत होतो तर कोण विचाराने मोठा
होतो.काही माणसे आपले ध्येय गाठण्यासाठी अपार मेहनतीने पुढे पुढे जातात.काहीजण आपल्या कुटुंबाला सांभाळून समाजसेवा करतात.असेच एक व्यक्तीमहत्व म्हणजे खेड तालुक्यातील चोरवणे गावचे प्रथम सरपंच असलेले माजी सरपंच कृष्णा गोविंद शिंदे यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी वृद्धापकाळाने ७ मे रोजी २०२२ रोजी निधन झाले.कृष्णा गोविंद शिंदे यांच्या जाण्याने शिंदे कुटूंबीय आणि चोरवणे गाव पोरका झाला आहे.

सरपंच हे गावचे आधारस्तंभ होते तसेच गावच्या विकासासाठी त्यांनी कायम पुढाकार घेतला होता.गावच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले अनेक निर्णय हिताचे आणि योग्य होते.त्यांच्या जाण्याने पंचक्रोशीतील जनता शोक व्यक्त करत आहे.कै.कृष्णा गोविंद शिंदे यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला.त्या कालची परिस्थिती एवढी बरोबर नसताना सुद्धा शेती करून आपल्या भावंडांचा सांभाळ केला.त्यांचे छोटे बंधू कॅप्टन लक्ष्मन गोविंद शिंदे यांनी ३२ वर्षे सैन्यामध्ये देशाची सेवा केली.कै.कृष्णा गोविंद शिंदे यांच्या शिकवणीमधून गावात अनेक समाजसेवक आणि सैनिक बनले.तरुण वर्गाला मार्गदर्शन ते कायम करत असत.गावात रस्ते,मंदिर बांधण्याच्या कामात त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते.तसेच त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला होता.पंचक्रोशीत प्रत्येक व्यक्तीशी चांगले संबध ठेऊन प्रत्येकाच्या सुख दुःखात सामील होऊन आधार देणारे,माणुसकी हीच जात मानणारे असे होते.

समाजकारणात प्रत्येक कामात पुढाकार घेणारे व्यक्तीमहत्व.माणूस प्रत्येक घरात जन्माला येतो पण अशी ठराविक लोक गरिबीत जन्माला येऊन पण इतरांना मोठे करणारी इतरांसाठी झटनारे कमी लोक असतात.असेच ते इतरांसाठी जगत होते.मनाने स्वच्छ,निर्मळ कधी ही भेदभाव न करणारे,सर्वाना सोबत घेऊन पुढे जाणारे समाजसेवक म्हणून नामवंत झाले.कोणतेही संकट प्रसंगी धावून जाणारे असे व्यक्तीमहत्त्व.कै.कृष्णा गोविंद शिंदे हे समोरचा माणूस लहान असो की मोठा सर्वाशी आदराने बोलत असत. त्यांच्या जाण्याने चोरवणे पंचक्रोशीत सामाजिक क्षेत्रांत पोकळी निर्माण झाली आहे. 

त्यांनी केलेली कामे,मार्गदर्शन व त्यांचे व्यक्तीमहत्व कायम सर्वांच्या आठवणीमध्ये राहील. गेली सहा दशके गावाची सेवा करणारा सूर्य मात्र अखेर मावळला.त्यांच्या या समाजसेवेला लाख लाख सलाम.अशा या महान  व्यक्तीमहत्वास चोरवणे गावाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.त्यांचे उत्तरकार्य बुधवार दिनांक-१८ मे २०२२ रोजी चोरवणे शिंदे गावठण येथे होणार असून समाजाने दुःखात सहभागी होऊन दुःख विसर्जन करावे ही विनंती.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध