Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १७ मे, २०२२

मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र या ठिकाणाहून येणारे बोगस बियाणे बाबत लक्ष घालण्याची शेतकऱ्यांची मागणी व बोगस बियाणे विक्रीवर कृषी विभागाची करडी नजर




जिल्ह्यातील बोगस बियाणे व खते विक्रीला आळा घालण्यासाठी धुळे जिल्ह्यात पाच भरारी पथके गठीत करण्यात आली आहेत.सदर पथके ही बोगस बियाणे विक्रीवर करडी नजर ठेवून आहेत.त्यातच गेल्यावर्षी धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये बोगस कापूस बी टी बियाणे च्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कारण हे दोन्ही जिल्हे गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर लागून आहेत म्हणून येथून बोगस बी टी बियाणे येण्यास खूप मोठा वाव आहे. हे प्रशासनाने शोधणे गरजेचे आहे. 

खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे खते कृषी निविष्ठा या वेळेवर उपलब्ध व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने यापूर्वीच नियोजन केलेले आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर एक भरारी पथके याप्रमाणे जिल्ह्यात चार ते पाच भरारी पथके स्थापन करण्यात आली आहे.जिल्हा स्तरावर कृषी विकास अधिकारी हे या भरारी पथकाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केलेली आहेत पथकातील कृषी विकास अधिकारी व मोहीम अधिकारी निरीक्षक,वजन मापे अधिकारी, हे सदस्य तर सदस्य सचिव म्हणून जिल्हा गुणवत्ता अधिकारी नियंत्रण निरीक्षक यांचा या पथकामध्ये समावेश करण्यात आला आहे रासायनिक खते व कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी या विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असून,यांच्यामार्फत कृषी सेवा केंद्र ची वेळोवेळी तपासणी करण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक कळणार आहे. 

तसेच अनधिकृत रित्या विक्री होणाऱ्या बियाणे व खते विक्री ला प्रतिबंध बसणार आहे. शेतकऱ्यांनी यापुढे अधिकृत बियाणे खरेदी ची पावती खरेदी केलेल्या बियाण्याचे पॅकिंगचे टॅंक लॉट नंबर पडताळून पाहणे गरजेचे आहे.पेरणी झाल्यावर बियाण्याचे पाकीट हे पीक निघेपर्यंत सांभाळून ठेवावेत शेतकऱ्यांना दुसऱ्या राज्यातून अनधिकृत दुकानातून किंवा सुट्टी बियाणे खरेदी करू नये. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पेरणी करावी म्हणजे शेतकऱ्याला भविष्यात होणारे नुकसान टाळता येईल. जादा दराने जर कोणी कृषी निविष्ठांची विक्री करीत असल्यास त्याची माहिती मिळाली तर त्याबाबत जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय कृषी अधिकारी कार्यालय यांचाकडे तक्रार करावी.म्हणजे दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन ही कृषी विभागाकडून करण्यात आले.मध्य प्रदेश,गुजरात, आणि महाराष्ट्र येथून देखील काही ठिकाण हे बोगस बियाणे शहरात किंवा तालुक्यात दाखल होत आहे. 

हे बोगस बियाणे कृषी सेवा केंद्र चालक घेऊन चोरी छुप्या मार्गाने शेतकऱ्यांना विक्री करीत असतात यात खास करून कृषी दुकानदार शेतकऱ्यांना बिल पावती देत नसतात. मात्र बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना हंगामाच्या शेवटी दिसून येतो. आणि कालांतराने त्याच्या उत्पादनात घट होते व त्याचे आर्थिक नुकसान होते म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या चे प्रमाण हे भयावह आहे,ज्याचे मूळ कारण शासनाने शोधले पाहिजे.तेवढेच प्रशासनाने याकडे बारकाईने लक्ष किंवा कारवाई करणे गरजेचे आहे

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध