Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २८ मे, २०२२

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मदतीसाठी "एक हात मदतीचा" या माध्यमातून शक्ती तुऱ्याच्या सामन्याचे आयोजन



मुंबई:अक्षय कदम/राजेश शिबे अक्षय कदम,राजू धावडे,राजेश शिबे,राजेंद्र जुवले आणि सुदर्शन जाधव,विजय भुवड यांनी खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील तसेच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मदतीसाठी "एक हात मदतीचा"या माध्यमातून ४ जून २०२२ रोजी शक्ती तुरा सामन्याचे आयोजन दिवा नगरीत करण्यात आले आहे.शक्तीवाले शाहीर कोकणरत्न पुरस्कार प्राप्त शाहीर संदिप मोरे आणि तुरेवाले शाहीर नितीन लोखंडे यांचा शक्ती तुरा सामना ठेवला आहे.

या कार्यक्रमासाठी सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर,सिने सृष्टीतील अनेक कलाकार,पत्रकार,कोकणातील अनेक कलाकार उपस्थित राहणार आहेत.सर्व चाहते वर्ग यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आंनद द्विगुणीत करून शतगुणीत करावा.१५० रुपयांची तिकीट आहे त्यातून मनोरंजन नक्कीच होईल पण यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळणार आहे.आपल्या सारख्या असंख्य चाहते वर्गाला एकच विनंती आहे आपण उपस्थित राहून अनमोल सहकार्य करा."एक हात मदतीचा"या उपक्रमाचा भाग होऊन सामाजिक सेवेला हातभार लावा. यांसाठी आयोजकांकडून विनंती करण्यात आली आहे.

या कार्यक्रम १ जानेवारी २०२२ रोजी रात्री ८ वाजता आकांक्षा हॉल बी.आर नगर दिवा आगासन रोड,दिवा येथे आयोजित करण्यात आला आहे तरी रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आंनद घ्या.तिकीट साठी संपर्क
सुदर्शन जाधव-९१६७८२१२७६
अक्षय कदम-८३६९८६७६९९
राजू धावडे-८४३३८०३५४५
राजेश शिबे-९७६९८१९३५१
राजेंद्र जुवळे-८८५५०३७८२४
विजय भुवड-७७१८९७६६२५


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध