Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ४ मे, २०२२
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्याची राजधानी असलेल्या धाडणे गावाचा आशापुरी मातेचा यात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ
साक्री तालुक्याची राजधानी असलेल्या धाडणे गावाचा आशापुरी मातेचा यात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ
धाडणे गावातील आशापुरी माते च्या यात्रा महोत्सवाला आजपासून प्रारंभ...
मामाच्या गावाला जाऊया अशा आशयाचं एक गीत लहान थोर साऱ्यांच्याच परिचयाचं...रोजच्या धकाधकीच्या जीवनातुन कुठेतरी विरंगुला मिळावा म्हणून गावाला जायचं दोन-चार दिवस राहायचं आणि पुन्हा नवी उर्जा घेऊन परतायचं असं आपल्यापैकी 99 टक्के लोकं नक्की करत असतील...
कोरोना सारखी महामारी आसल्याने दोन वर्षे पासून धाडणे येथील यात्रा भरली नाही.मात्र राज्य सरकारने निर्बंध शिथिल केल्या नंतर यात्रा नाही परवानगी दिली गेली आहे. त्यामुळे साक्री तालुक्यातील धाडणे गाव येथील आशपुरी मातेची प्रसिद्ध यात्रा 5 एप्रिल पासून सुरुवात होत आहे. ही यात्रा 12 तारखेपर्यंत चालू राहणार आहे. कोरोना मुळे अनेक व्यवहार ठप्प झाले होते. त्यात मंदिरेही बंद होते.त्यामुळे यात्रा ही भरण्यास कडक निर्बंध लादले गेले होते.आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाचे नियम पाळून यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे गेले दोन वर्ष यात्रा मोहत्सव झाला नव्हता. मात्र यावर्षी 5 एप्रिल पासून यात्रेला सुरुवात होत आहे.
त्यामुळे कोरोणा काळात न झालेल्या यात्रेची प्रतीक्षा संपली आहे.जत्रेचं वातावरण रंगीबेरंगी असतं.ग्रामदैवतानं मंदिर रंगवलं जातं. मंदिराच्या अंगणात पारंपरिक सनई-चौघडा असतो.
भोवतालच्या परिसरात मांडव घातले जातात.खाद्य पदार्थ,तर काही ठिकाणी खेळणी,बांगड्या,दागिने,कपडे असे विविध स्टॉल सजायला लागतात.ग्रामदैवताच्या पालखी मिरवणुकीसाठी मार्गही रंगीबेरंगी पताकांनी सजविला जातो.यात्रा उत्सव पाहण्यासाठी जिल्हा व जिल्ह्याबाहेरील भाविक हजेरी लावतात.भाविक याठिकाणी येऊन आपली नवसपूर्ती करतात.रथाची मिरवणूक,तमाशा पाहण्यासाठी शहरातील तसेच परिसरातील नागरिक यात सहभाग घेऊन आनंद लुटतात.गावातील प्रत्येकाच्या घरी यात्रा पाहण्यासाठी पाहुण्यांची रेलचेल बघायला मिळते.गावाची नाळ तुटलेली शहरातील मंडळी जत्रेच्या निमित्तानं वेगवेगळे उद्देश असले,तरी पुन्हा एकदा मातीतल्या संस्कृतीशी जोडली जात आहेत.एवढंच नव्हे,तर फेसबुकसारख्या सोशल मीडियावरही गावाकडच्या जत्रेतील क्षणचित्रं आता दिसायला लागली आहेत.
असे असतील कार्यक्रम गुरुवारी 5 एप्रिल रोजी आशापुरी माता च्यायात्रोत्सवानिमित्त सकाळी 6 वाजेपासून आरती,महापूजा, मंदिर येथे सायंकाळी 5 ते 9 रथाची मिरवणूक, रात्री 9 नंतर लोकनाट्य तमाशा मंडळ असे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच 6 एप्रिल रोजी सकाळी 8 वा. कुस्ती ची भव्य दंगल आयोजित करण्यात आली आहे.पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी यात्रे उत्सवात सहभागी होऊन यात्रे चा आनंद घ्यावा.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा