Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २४ मे, २०२२

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हंडा मोर्चा.धुळे मनपा मध्ये पाणीटंचाईच्या विरोधात राष्ट्रवादीचे जोरदार मनपा विरोधात आंदोलन



धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज धुळे मनपा व भाजपाच्या विरोधामध्ये पाणी टंचाई व पाणी समस्या बाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धुळे शहर जिल्हाध्यक्ष श्री.रणजीत राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाशी राणी पुतळा पासून ते धुळे महानगरपालिका येथे हंडा मोर्चा काढण्यात आला होता.
धुळे महानगरपालिकेचा हद्दीमध्ये नळाला आठ दिवसानंतर पाणी येते,काही ठिकाणी तर पंधरा दिवसानंतर पाणी सोडले जाते. यामुळे धुळे शहरातील नागरिकांचे अतोनात हाल होत आहे.

एखाद्या खेड्या गावा प्रमाणे आणि दुर्गम पाड्या प्रमाणे लोक हंडे घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पाणी भरता आहेत. लहान मुलं आणि महिला,विद्यार्थी सुद्धा सुट्टीचा उपयोग हा पाणी वाहण्यासाठी करीत आहे.हि महानगरपालिका व भाजपासाठी लाजिरवाणी आणि शरमेची बाब आहे.सत्तेमध्ये भाजपला येऊन तीन वर्ष झाले, परंतु भाजपचे पदाधिकारी हे सत्ता व खुर्चीमध्ये मसगुल आहेत.परंतु पाणी प्रश्नाकडे त्यांनी लक्ष दिले नाही. राज्य सरकारने वेळोवेळी पाण्यासाठी, पाणी प्रश्नासाठी आणि पाण्याच्या सुविधा साठी करोडो रुपयांची मदत महानगरपालिका धुळेला केलेली आहे. परंतु मनपाच्या नियोजनशून्य आणि गलिच्छ कारभार मुळे लोकांना वेळेवर पाणी मिळत नाही,अशा गलिच्छ कारभारामुळे धुळेकर जनता परेशान झालेली आहे.आठ आठ दिवसानंतर नळाला पाणी येत असेल तर,वर्षभराची पाणीपट्टी नागरिकांनी का भरावी? वर्षाला 55 दिवस पाणी सोडता आणि 365 दिवसाची पाणीपट्टी आकारता हा जनता वर अन्याय आहे.

ज्यांनी एक दिवसाआड पाणीपुरवठा करू असे वल्गना केल्या होत्या,ते गिरीश महाजन कुठे आहेत? असाही प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विचारला आहे.यावेळी धुळे महानगर पालिकेच्या गेटवर पाण्याच्या मटके व हंडी फोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी धुळे मनपा चा निषेध केला आहे. लवकरात लवकर पाणी जर वेळेवर जनतेला दिले नाही,तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना व अधिकाऱ्यांना केबिनमध्ये बसू देणार नाही.असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे.

यावेळी संपूर्ण शहरातील नागरिकांची पाणीपट्टी माफ करावी अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली.
आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी,कार्यकर्ता,महिलांनी मोठ्या संख्येने पाण्याचे हंडे आणि मटकी घेऊन सहभाग घेतला.मोठमोठ्याने भाजपाच्या आणि मनपाच्या विरोधात घोषणा देऊन महानगरपालिकेचा परिसर दणाणून  सोडला.या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळेस नंदु येलमाले,महेंद्र शिरसाठ,जितु पाटील,दिपक देसले,संदीप पाटील,दानिश पिंजारी,गोलू नागमल,राजू चौधरी, कृष्णा गवळी,असलम खाटीक,स्वामींनी पारखे, अब्दुल अन्सारी,जुनेद शेख,एजाज शेख, जुनेद शेख,संजय सरद,वाल्मीक मराठे, प्रणव भोसले,हिमानी वाघ,किरण बागुल, गिरीश भामरे,ज्ञानेश्वर भामरे,भोला भाऊ वाघ आसिफ हाजी,रईस काजी, जयदीप बागुल,बरगद शेख,सागर चौगुले, राज कोळी,कैलास चौधरी,निलेश चौधरी, भुषण पाटील,राहुल पोळ,श्रुतिक पोळ, दत्तु पाटील,चेतना मोरे,उमेश महाले, नितीन पाटील,स्वप्निल पाटील,राजेंद्र चीतोडकर,कमलेश देवरे,भिका भाऊ नेरकर,दीपक देवरे,करुणा पाटील, डॉमोनिक मलबारी,शोबा पाटील,
आशा आहिरे,ज्योती नेमाने,मंगला वाघ, भारती तावरे,कविता पदमोर,ललिता महाले शिंदू बाई गुरव,सुनिता महाले, दिपाली पाटील,आशा बाई तारागे,कस्तुरा बाई चौधरी चित्रा बाई खैरनार,पुष्पा बाई कळूंखे,मनीषा चौधरी,सिंधु बाई गांगुर्डे, शांता बाई कासोदे जिजाबाई आखाडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध