Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ जून, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिंदखेडा तालुक्यातील सहा हजार शेतकऱ्यांना 9 कोटी 28 लाख खरीप पिक विमा मंजूर.कृषी मंत्री नामदार दादा भुसे यांच्याकडे केला होता पाठपुरावा- शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांच्या प्रयत्नांना यश
शिंदखेडा तालुक्यातील सहा हजार शेतकऱ्यांना 9 कोटी 28 लाख खरीप पिक विमा मंजूर.कृषी मंत्री नामदार दादा भुसे यांच्याकडे केला होता पाठपुरावा- शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांच्या प्रयत्नांना यश
शिंदखेडा तालुक्यातील सहा हजार शेतकऱ्यांना 9 कोटी 28 लाख खरीप पिक विमा मंजूर.कृषी मंत्री नामदार दादा भुसे यांच्याकडे केला होता पाठपुरावा- शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांच्या प्रयत्नांना यश--- खरीप पिकांचा विमा मिळाल्याने शेतकरी आनंदित
शिंदखेडा (प्रतिनिधी) शिंदखेडा तालुक्यातील सुमारे 5 हजार 759 शेतकऱ्यांना खरीप पिक विमा शासनाने मंजूर केला आहे राज्याचे कृषिमंत्री नामदार दादासाहेब भुसे यांच्या आदेशाने शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांच्या पाठपुराव्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना गेल्यावर्षीचा खरीप हंगामाचा विमा मिळाल्याने कृषिमंत्री नामदार दादाजी भुसे यांनी दिलेला शब्द पाळल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी खरीप हंगाम 2021 पिक विमा एकूण 9 हजार 517 शेतकऱ्यांनी काढला होता.
त्यात पिकनिहाय विमा काढलेले शेतकरी व त्यांना मिळालेला लाभ पुढीलप्रमाणे असा कि,उडीद पिक 70 शेतकरी शंभर टक्के मंजूर सहा लाख ९६ हजार , मुग 1776 शंभर टक्के दोन कोटी 35 लाख 85 हजार रुपये,तुर पिक 84 शेतकरी मधुन 5 मंजूर 24 हजार रुपये ,ज्वारी 120 शेतकरी मधुन 106 मंजूर 5 लाख 40 हजार रुपये , बाजरी शेतकरी 301 शंभर टक्के मंजूर 9 लाख 83 हजार रुपये, मका शेतकरी 1432 पैकी मंजूर 1187 एकुण 1कोटी 29 लाख एक हजार रुपये ,तीळ अकरा शेतकरी पैकी मंजूर एक ही नाही. सोयाबीन 76 शेतकरी पैकी 76 शंभर टक्के मंजूर 10 लाख 61हजार तर भुईमूग 151शेतकरी पैकी 41मंजुर 1लाख 89 हजार रुपये , कांदा 53 शेतकरी पैकी 16 शेतकरी मंजूर 1 लाख 25 हजार रुपये. कापूस 5443 शेतकरी पैकी 2181शेतकरी मंजूर 5 कोटी 27 लाख 84 हजार रुपये असे एकूण 9517 शेतकरी पैकी 5759 शेतकरी ना लाभ मिळणार असून 9 कोटी 28 लाख 96 हजार रुपये मंजूर झाले आहे.
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. म्हणुन शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी नामदार दादासाहेब भुसे यांचेसह शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांचे आभार मानले असून यासाठी शिवसेना जिल्हा संघटक मंगेश पवार शिवसेना तालुका समन्वयक विनायक पवार माजी सभापती विश्वनाथ पाटील बेटावदचे राजू माळी आदींनी शेतकऱ्यांसाठी च्या विमा मिळाल्याने स्वागत केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा