Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १७ जून, २०२२

शिंदखेडा तहसीलदारांवर गुन्हा दाखल करा महसूल आयुक्तांचा आदेश : बेकायदा जमीन खरेदी - विक्रीचे प्रकरण भोवले



शिंदखेडा प्रतिनिधी : शिंदखेडा तालुक्यातील सोंडले,डांगुर्णे व बाभळे येथे झालेल्या अनेक बेकायदेशीर जमीन खरेदी विक्री व्यवहाराप्रश्नी कठोर कारवाईसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करून तहसीलदार सुनील सैदाणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा,तसेच विभागीय चौकशी करावी,असा खळबळजनक आदेश विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बजावला.याबाबत त्यांनी धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना अंमलबजावणीचे निर्देश दिले. 

शिंदखेडा येथील तहसीलदार सैंदाणे यांनी तालुक्यातील डांगुणे,सोंडले व बाभळे येथील सरकारी जमिनीबाबतचा नजराणा स्व अधिकाराने भरून घेतल्याबाबत त्यांच्याविरुद्ध.तरतुदीनुसार निलंबन विषयक कार्यवाहीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना सादर झाला आहे. 

त्यानुसार तहसीलदार सैदाणे यांना निलंबित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर झाला आहे.

या प्रकरणी माजी आमदार अनिल गोटे यांनी तक्रार केली होती.तहसीलदार सैंदाणे यांनी कोणतीही प्रशासकीय,कायदेशीर कार्यवाही न करता अतिक्रमण नियमानुकुल करणे व भोगवटादार वर्ग दोनमधून भोगवटादार वर्ग एकमध्ये रूपांतरण करण्याची कार्यवाही केली . सोंडले येथील गट क्रमांक ९ ६ / १ व आणि डांगुर्णे येथील गट क्रमांक १४ / ९ बाबत जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार वापरून स्व अधिकारात नियमबाह्य आदेश पारीत केले.त्यामुळे तहसीलदार सैंदाणेंविरूध्द तरतुदीनुसार विभागीय चौकशीचा प्रस्ताव शासनाकडे सादर झाला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध