Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १५ जून, २०२२

राज्यातील खरीप हंगामासाठी खते,बि बियाणे,औषधें यामध्ये शेतकर्याची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभाग सज्ज



राज्यभरात सध्या पावसाळा सुरु झाला असून शेतकऱ्यांची कामांची लगबल सुरु आहे. तसेच बियाणे आणि खते खरेदीसाठी शेतकरी लगबग सुरु आहे. असे असताना मात्र खते खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. ज्या (Agricultural Department) कृषी विभागावर कृषी क्षेत्राचा डोलारा उभा आहे त्याच विभागातील अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने हा प्रकार सुरु असून महाराष्ट्रातील सहा खत कंपन्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश केंद्राने राज्याला दिले आहेत.
यामुळे अनेक ठिकाणी कारवाई केली जात आहे. आता राज्यातील 6 खत कंपन्यांकडून अवैध कागदपत्रांची जुळवाजुळव करुन खताची विक्री, अनाधिकृत खताचा साठा अशा एक ना अनेक बाबी समोर आल्या आहेत. यामुळे शेतकरी संभ्रमात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. राज्यातील 6 कंपन्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश केंद्राने राज्याला दिले आहेत.
या सात कंपन्यांमध्ये सांगली येथील लोकमंगल कंपनी, तसेच वसंत अग्रो टेक, नागपूरातील विदर्भ मार्केटींग फेडरेशन, कोल्हापुरातील शेतकरी सहकारी संघ, औरंगाबाद येथील देवगिरी फर्टिलायझर अशी या कंपन्यांची नावे आहेत. यामुळे आता इतर कंपन्या अशाप्रकारे फसवणूक करताना हजार वेळा विचार करतील. शेतकऱ्यांवर सध्या अनेक संकटे येत आहेत. यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
सध्या घटते उत्पादन आणि वाढता खर्च यामुळे शेतकरी त्रस्त असतानाच आता असे प्रकार समोर येऊ लागल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट कसे व्हावे हा मोठा प्रश्न आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. उत्पादन वाढीसाठी प्रमाणित बियाणे महत्वाचे आहे. मात्र असे प्रकार समोर येत असल्याने अनेकदा शेतकऱ्यांना संकटांचा सामना करावा लागत आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध