Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १५ जून, २०२२

साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरातील तहसील कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर



साक्री तालुक्यातील पिंपळनेर तहसील कार्यालयाचा भोंगळ कारभार यावेळी निदर्शनास आला. यामध्ये पिंपळनेर परिसरातील सुमारे 38 ते 40 गाव खेडी या कार्यालयाशी प्रशासकीय संलग्न असून महसूल व अन्य शालेय कामकाजासाठी परिसरातील विध्यार्थी,गोरगरीब आदिवासी बांधव, महिला,जेस्ट नागरिक  या पिंपळनेर तहसील कार्यालयात कामानिमित्ताने येत जात राहतात. परंतु या कार्यालयातील कर्मचारी आपल्या शासकीय कार्यालयीन वेळात वेळोवेळी गैरहजर राहिल्या चित्र अनेकदा निदर्शनास आले आहे. नागरिकांना आपल्या छोट्या-मोठ्या कामांसाठी अनेकदा या कार्यलयात हेलपाटे मारावे लागतात. व अनेक वेळा कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे पैशांची मागणी, अरे रावीची भाषा, असे अनेक प्रकार आजवर पहावयास मिळाले आहेत. हे लोक सेवक नसून लोकांना मनस्ताप देण्याचे चुकीचे काम यांच्याकडून सर्रासपणे केले जात आहे. यांचा चालू असलेला मनमानी कारभार नागरिकांची होणारी हेळसांड हे सर्व चित्र अत्यंत भीषण आणि निषेधार्थ आहे. तरी या पिंपळनेर तहसील कार्यालयातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठ अधिकारीचा आशीर्वादाने दलालांचा  देखील सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसून येत आहे. कार्यालयीन वरिष्ठ कर्मचारी ते अधिकारी यांच्या अशा कारभारामुळे चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी म्हणजेच स्वच्छता कर्मचारी हे देखील आपल्या कामात कसूर करत असल्यामुळे आढळून आले आहे ते यावरून की परिसरात घाणीचे साम्राज्य माजलेले दिसून येत आहे.यामुळे साथीचा आजाराचा देखील धोका वाढू शकतो तरी या सर्व प्रकारावर मा. तहसीलदार पिंपळनेर यांनी या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेऊन कार्यवाही करावी अन्यथा  साक्री व पिंपळनेर तालुका शिवसेना पद अधिकाऱ्यांकडून सेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असे निवेदनाद्वारे माननीय अप्पर तहसीलदार पिंपळनेर यांना साक्री तालुका शिवसेनेतर्फे देण्यात आले यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख मा. किशोर वाघ पिंपळनेर तालुका प्रमुख हीमत साबळे व खालील प्रमाणे शिवसेनेचे तालुका पदाधिकारी श्री. तुषार गवळी,उदय बिरारी,रमेश शिंदे, दीपक साळुंके,पवन सोनवणे, मयूर नांद्रे,रवींद्र खैरनार,अभय शिंदे,राहुल पाटील, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध