Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १९ जून, २०२२
Home
/
Unlabelled
/
दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचां लक्ष लोकहित संघर्ष पत्रकार संघाच्या वतिने सत्कार
दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचां लक्ष लोकहित संघर्ष पत्रकार संघाच्या वतिने सत्कार
धुळे प्रतिनीधी-: धुळे शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आल्याने आज दि.18-06-2022 रोजी लक्ष लोकहित संघर्ष पत्रकार संघाच्या वतिने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचां श्वाल व प्रसीस्थी पत्र देउन सत्कार करण्यात आला,जीवनात आलेल्या कठीण प्रसंगाला तोंड देत अनेक विद्यार्थ्यानी परीक्षेत यश संपादीत केले त्यातीलच सोनगीर येथील कोविडमुळे पितृछत्र गमावलेली विद्यार्थीनी मोहिनी शिवदास गायकवाड ने गरीबीचा बाऊ न करता मोठ्या जिद्दीने संकटाना तोंड देउन यश आपल्या जिद्दीच्या जोरावर खेचुन आनले असे म्हटले तरी वावग ठरनार नाही,मोहीणीचे यश अनेक हालाकीच्या परिस्थीती तील विद्यार्थ्याकरीता प्रेरणादायी ठरेल,पितृछत्र हरपल्या मुळे मोहीनी वर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली.
या स्थितीत न डगमगता तिने कुंटुबाला आर्थीक हातभार लावण्या साठी मीळेल ते काम केले.तसेच दहावीच्या परीक्षेत 83% टक्के गुण मीळवुन यश संपादन केले.उच्च शिक्षण घेवुन जिल्हाधिकारीच होणार असल्याचा ठाम निच्चयच मोहीनी ने केलाय.सोनगीर येथील कॉ.शिवदास गायकवाड यांचा धुळे येथे कृषी साहित्य विक्री चा व्यवसाय होता त्यातुन ते परिवाराचा उदरनिर्वाह करत होते.त्यांना मोहिनी सह चार मुले आहे.
कोविडमुळे 2 जून 2021 रोजी त्यांचा दुरदैवि मृत्यू झाला.अचानक घराचा आधार गेल्याने परीवारावर मोठा डोंगरच कोसळला तरी खचुन न जाता मोहिनि सोनगीर येथील एन.जी.बागूल हायस्कूलच्या सर्व शिक्षकांच्या सहकार्यने व मार्गदर्शना मुळे व स्वंताच्या जिद्दीने परीक्षेत यश संपादन केल.पितृछत्र हरवल्या नंतर दुखातुन अर्धे सावरल्याने मोहिनी ला परीक्षेला एक ते दोन महिने अभ्यासा साठी मीळाले तरी तिने सर्व लक्ष अभ्यासावर केंद्रीत करुन 83.20% टक्के गुण मिळवुन यश संपादन केले आहे,तसेच सोनगीर येथील बँड कलावंत जगन नेटारे यांची कन्या, सविता नेटारे ने देखील ई 10 वी च्या परीक्षेत 61.20 टक्के मीळवुन यश संपादन केल आहे.
कापडणे येथील शेतकरी उमाकांत खलाणे माळी यांचे चिरंजीव प्रशांत खलाणे यांनी देखील 88.60 टक्के गुण मीळवुन क्रमांक दोन चे यश संपादन केल आहे, कापडणे ग्रामपंचायत क्लर्क संतोष पारधी यांची कन्या गायत्री पारधी ने 85.60 टक्के मीळवुन यश संपादन केल आहे.
या सर्व विद्यार्थ्याचा सत्कार लक्ष लोकहित संघर्ष पत्रकार संघाच्या वतिने करण्यात आला यावेळी उपस्थित लक्ष लोकहितसंघर्ष पत्रकार संघा चे संस्थापक अध्यक्ष समाधान सुनिल देवरे,महाराष्ट्र प्रदेश महासचिव संतोष पारधी,महाराष्ट्र प्रदेश संघटक शोभाताई आखाडे,यासह विद्यार्थ्याचे पालक उपस्थीत होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा