Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १२ जून, २०२२

जिल्हाधिकारी शर्मा यांचाकडे निवेदनाव्दारे मागणी शिरपूर सह धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे केळी सह पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावे : बबनराव चौधरी

शिरपूर : धुळे जिल्ह्यातील मागील २-३ दिवसापासून वादळी वाऱ्यासह पावसाने धुळे, शिरपूर, शिंदखेडा, साक्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालेले आहे. शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने येऊन गेल्याने शेतकरी संकटात सापडलेले आहेत. याबाबत माहिती घेतली असता मुख्यता केळी, पपई व इतर पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तात्काळ करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र तर्फे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी अध्यक्ष जिल्हास्तरीय पिक विमा आढावा समिती व जिल्हास्तरीय पिक विमा तक्रार समिती तथा धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचाकडे निवेदनाध्दारे केली आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, या बाबत शेतकऱ्यांच्याशी चर्चा करीत असताना असे निदर्शनास आले आहे की, खरीप हंगामाच्या तोंडावर पिकांचे नुकसान झाल्याने पुढील पिकांचे नियोजन करण्याकरता शेती तयार करणे गरजेचे असून पंचनामे झाल्याशिवाय शेतामध्ये नुकसान झालेले पिक बाहेर काढता येत नसल्याचे कळले आहे. तरी आपणास या निवेदनाद्वारे विनंती करतो की आपण तात्काळ संबंधित यंत्रणा व विमा कंपनी यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून पुढील आठ दिवसात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण करण्याबाबत आदेशित करावे जेणेकरून शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिके घेणे शक्य होईल. असे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी अध्यक्ष जिल्हास्तरीय पिक विमा आढावा समिती व जिल्हास्तरीय पिक विमा तक्रार समिती तथा धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना (दि.१२ जुन) रोजी ईमेल ने पाठवलेल्या निवेदनाध्दारे केली आहे. त्या नमुद केले आहे की, शिरपूर तालुक्यात केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी केळी पिकाचा विमा मोठ्या प्रमाणात काढलेला आहे. तालुक्यातील घोडसगाव परिसराला पावसाचा जोरदार फटका बसला आहे. तेथील फळबागा जमिनदोस्त झाल्या आहेत. तालुक्यातील घोडसगाव, पिळोदा परिसरात केळीची मोठया प्रमाणावर लागवड केली जाते. उकाड्याने झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला, मात्र पावसासोबत जोरदार हवा असल्यामुळे केळी बागा भुईसपाट झाल्या आहेत. पिकांचे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसामुळे घोडसगाव, पिळोदा, होळनांथे परिसरात केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांची वादळी पावसामुळे केळी बागांना फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेली पिके मातीमोल झाल्याने कृषी विभागाने तत्काळ नुकसानीची पाहणी करून पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गामधुन होत आहे. तरी आपण संबंधित विमा कंपनीचे प्रतिनिधी यांना पुढील ८ दिवसा पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात जेणेकरून शेतक-यांना खरीप हंगामाची तयारी करता शेती तयार करणे सोयीचे होईल. तसेच या कालावधीत पंचनामे पूर्ण न झाल्यास व शेतकरी नुकसान भरपाईच्या मदती पासून वंचित राहिल्यास याला संबंधित विमा कंपनी जबाबदार राहील याची देखील लेखी कल्पना संबंधित विमा कंपनीस आपण करुन द्यावी तरी आपण तात्काळ या विषयाबाबत निर्णय घ्यावे असे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी निवेदनात म्हटले आहे.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध