Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १२ जून, २०२२

साक्री तालुका भाजप पद अधिकारीऱ्यांनी भाजप राज्यसभा चा तिन्ही विजयी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत केले



साक्री तालुका भारतीय जनता पार्टी ने साजरा केला विजयोत्सव आज सायंकाळी 5 वाजता साक्री भाजपा कार्यालयासमोर , भाजपा चे धुळे जिल्हा उपाध्यक्ष मा.भैया सो चंद्रजीत पाटिल व साक्री विधान सभा प्रमुख इंजी. मोहन जी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात फटाके फोडून, घोषणा देऊन विजय जल्लोष साजरा करण्यात आला. काल झालेल्या राज्य सभे च्या निवडणुकीत महा विकास आघाडी ला धोबी पछाड़ देऊन भाजपा चे सहा पैकी तीन उमेदवार निवडून आणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांनी जी कमाल करून दाखवली त्या बद्दल त्यांचे ही अभिनन्दन करण्यात आले. खानदेश चे नेते माजी केंद्रीय मंत्री मा. डॉ बाबासाहेब भामरे, माजी मंत्री मा. अमरीश जी पटेल, माजी मंत्री मा. जयकुमार जी रावल, खासदार मा.हिना ताई गावित, व मतदान प्रक्रियेत भाग घेतलेल्या सर्व आमदारांचे अभिनन्दन करण्यात आले. यावेळी भाजपा साक्री मंडळ अध्यक्ष, वेडू आण्णा सोनवणे, उपाध्यक्ष राकेश दहिते,सहकार आघाडी चे योगेश भामरे, तालुका बूथ सयोजक Ad, सुरेश शेवाले, युवा मोर्चा अध्यक्ष शिवाजी देवरे, ओबीसी आघाडी चे महेंद्र देसले, पिंपलनेर मंडळ उपाध्यक्ष विक्की कोकणी, जिल्हा परिषद सदस्य खंडु सेठ कुवर, साहेबराव गांगुर्डे,माजी तालुका अध्यक्ष विजय भोसले, आबासाहेब सोनवणे, डॉ देवेंद्र देवरे,शहर उपाध्यक्ष स्वप्निल भावसार, शक्ति केंद्र प्रमुख सुभाष निकम सर, अनिल पवार सर, नैनेश जी  भामरे,धर्मराज सोनवणे,डॉ मुकुंद बोरसे, जगदीश कुवर, प्रसाद जी पंडित, विनोद पाटिल,व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध