Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ६ जून, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिंदखेडा शहरातील भारतीय सैनिक दलातील सेवानिवृत्त भुषण पवार यांचे जल्लोषात स्वागत व भव्य नागरी सत्कार
शिंदखेडा शहरातील भारतीय सैनिक दलातील सेवानिवृत्त भुषण पवार यांचे जल्लोषात स्वागत व भव्य नागरी सत्कार
शिंदखेडा- प्रतिनिधी :येथील साईलिला नगरातील रहिवासी असलेले आणि भारतीय अर्धसैनिक दलातुन २१ वर्ष सेवा करुन सेवानिवृत्त भुषण अभिमन पवार यांचे शिंदखेडा शहरातुन सवादय मिरवणुकीने जल्लोषात स्वागत व भव्य नागरी सत्कार करण्यात आला.ह्यावेळी खानदेश रक्षक दलाचे माजी सैनिक व शहरातील सर्वच स्तरावरील मान्यवर व नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील साईलिला नगरातील रहिवासी असलेल्या भुषण अभिमन पवार हे भारतीय अर्धसैनिक दलात सेवा करुन सेवानिवृत्ती नंतर घरी सुखरूप परतलो तर यानिमित्ताने साईलिला नगर मित्र परिवार, खानदेश रक्षक संस्थेचे माजी आजी सैनिक,पवार कुटुंब व नातलग व विविध सर्व स्तरावरील मान्यवर व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भव्य मिरवणूक व नागरी सत्कार करण्यात आला.शहरातील भगवा चौकापासून नगराध्यक्षा रजनीताई अनिल वानखेडे व गटनेते अनिल वानखेडे आणि खानदेश रक्षक दलाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गिरासे, संजीव नगराळे, नंदलाल साळुंखे यांच्या हस्ते मिरवणूकीला प्रारंभ झाला.त्यानंतर ठिक ठिकाणी भुषण पवार यांचे शहरातील महिलासह नागरिकांनी औक्षण करून पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.डिजेच्या तालावर तरुणांनी व माजी सैनिकांनी मनमुराद आनंद लुटला व स्वागत केले.
फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली. त्यानंतर साईलिला नगर येथे समारोप झाला.भव्य नागरी सत्कार व्यासपीठावर सेवानिवृत्त सैनिक भुषण पवार यांना खानदेश रक्षक संस्थेचे माजी सैनिकांनी शिस्त बद्ध पद्धतीने संचलन करून विराजमान केले. प्रथमच कै.अभिमन नथ्थु पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून नतमस्तक होऊन आई विमलबाई पवार यांचे भुषण पवार व पल्लवी पवार सपत्नीक आर्शिवाद घेतले.छत्रपती शिवाजी महाराज व भारतमातेला वंदन केले.सुरुवातीला पवार कुटुंबातील पुर्वी पवार,परिनिती पवार,उदय पवार, जान्हवी पवार,जयेश पवार यांनी देशभक्ती गितावर नुत्य सादर करून आपल्या काका व वडीलास अनोखी भेट देऊन प्रेक्षकांचे मने जिंकली व भाऊक केले.
त्यानंतर थोरले बंधू विनायक पवार व सपना पवार, भरत पवार आणि रेखा पवार बहिण स्वाती पाटील व रविंद्र पाटील अहमदाबाद यांनी सपत्नीक सत्कार केला.तसेच खानदेश रक्षक संस्थेचे माजी आजी सैनिकांनी सत्मानचिन्ह देऊन सत्कार केला.नंदुरबार चे माजी उपनगराध्यक्ष श्याम बाबू मराठ उद्योगपती पावबा हिरामण मराठे मराठा समाजाचे सचिव प्रल्हाद मराठ अरुण शिवदास मराठे तसेच शहरातील माजी पंचायत समिती सभापती प्रा. सुरेश देसले, गटनेते दिपक देसले, विरोधी पक्षनेते सुनील चौधरी नगरसेवक उदय देसले, अरुण देसले,दिपक अहिरे, शहराध्यक्ष प्रविण माळी,प्रकाश चौधरी, सुभाष माळी, युवराज माळी, सुरज देसले, मनिष देसले, यादव मराठे, जे.एम.मराठे, मधुकर मराठे, गणेश मराठे, दादा मराठे, मोहन परदेशी, हेमंत चित्ते, गुलाब सोनवणे,स्वप्निल मोरे, महेंद्र मराठे, अनिल मराठे, पत्रकार संघाचे पदाधिकारी विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते समाजातील नातलग मंडळी नी सत्कार केला. त्यांच्या सेवा प्रवासातील अनेक आठवणी विषयी अनेक पदाधिकारी यांनी गौरवोद्गार काढले. भारतीय अर्धसैनिक दलात सेवा करत असतांना देशातील जवळपास दहा राज्यात 21 वर्षे सेवा देणारे अत्यंत कठीण राज्यात झारखंड, पंजाब,उत्तरप्रदेश,गुजरात,बिहार, मुंबई,जम्मु काश्मीर मध्ये आपली सेवा केली आहे.
सेवेत आपल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल हथियार प्रशिक्षण,फायरल यासह अनेक ठिकाणी गौरविण्यात आले आहे. हथिथार प्रशिक्षण मध्ये जवळपास 25 पारितोषिक पटकावले आहे. सैन्य दलात गौरव प्राप्त करणे दुर्मिळ असते पण आपल्यात असलेले सुप्त गुण भारतीय सिमेवर दाखवून दिले आहे.ते सुटीवर जरी घरी यायचे तरी आजच्या नवतरुणांना सैन्य दलात भरती होण्यासाठी चे मार्गदर्शन शिबिर व विविध मैदानी स्पर्धा घेऊन प्रेरणा देण्याचे कार्य करीत होते.आता सेवानिवृत्ती नंतर सैनिक प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा मानस व्यक्त केला आहे.
त्या माध्यमातून शहरासह तालुक्यातील तरुणांना स्फूर्ती देणारा व करिअर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. असे भुषण पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले.सुत्रसंचलन हेमलता मराठे,प्रविण मराठे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी खानदेश रक्षक संस्था, साईलिला नगर,साईनगर मित्र परिवार, वृक्ष संवर्धन समिती,द रनन्सऀ गृप,नेताजी सुभाषचंद्र बोस मित्र परिवार, लक्ष्मीनारायण मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - वरवाडे नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत युवा नेतृत्वाचा चे...
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा