Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ६ जून, २०२२
Home
/
Unlabelled
/
धुळे व नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीन भागातील कृषी व्यापारी व शेतकरी याना रा.खते खरीप हंगामात वेळेवर उपलब्ध होण्यासाठी शासनाने वाहतूक ठेकेदाराचा प्रश्न मार्गी लावावा
धुळे व नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीन भागातील कृषी व्यापारी व शेतकरी याना रा.खते खरीप हंगामात वेळेवर उपलब्ध होण्यासाठी शासनाने वाहतूक ठेकेदाराचा प्रश्न मार्गी लावावा
मा.जिल्हाधिकारी साहेब यांनी लक्ष घालून
धुळे नंदुरबार जिल्हातील
ग्रामीण भागातील खत कंपनी पुरवठा करणे असमर्थ आणि वाहतूक ठेकेदार यांची मन मानी भाडे वाढ कृषी व्यापारी व शेतकरी वर्गात तीव्र नाराजी
सध्या पेरणी हंगाम सुरू झाला आहे मागणी पेक्षा अत्यल्प साठा पुरवठा रासायनिक खताचा होत आहे , त्यात खत कंपनी अधिकारी लिंकिंग नाव खाली खत पुरवठा ठराविक साठे बाज व्यापाऱ्यांना देऊन मार्केट मध्ये शॉर्ट सप्लाय करून भाव वाढ किंवा लिंकिंग लाऊन खताचा काला बाजार करत आहेत सरहास यात राजकीय स्वार्थ पोटी नेते ही त्यांची माणसे संभालाताना दिसत आहेत.
कृषी अधिकारी टार्गेट प्रमाणे एक दोन जवळ ची दुकाने तपासणी करून आपले कर्तव्य पार पाडत आहेत.
शेतकरी मात्र नाडला जात आहे .
ग्रामीण भागातील सेवा संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्या पैसे देऊनही महिने आधी त्यांना पुरवठा केला जात नाही परंतु उधारी वर घेणाऱ्या व्यापरयाना मात्र पुरवठा इफको क्रिबको कंपनी चे अधिकारी आणि इतर खत कंपनी चे अधिकारी ही मन मानी करत आहेत.
आम्हाला खत वेळेवर मिळाले नाही तर शेतकऱ्यांना सांगावे लागत आहे transport contract 160 ते 200 प्रती टन देऊन गाडी भरून घेऊन जा सांगत आहेत 1600 ते 2000 रुपयात बाजारात गाडी मिळत नाही आणि 4500 ते 10000 रुपये देऊन गाडी भरून आणली तर काय दराने विक्री करावी हे ही कळत नाही . खत राष्ट्रीय पातळीवर नियंत्रित दरात विक्री करा असे सांगितले जाते पंत प्रधान पासून ते जिल्ह्याचे खासदार ही केंद्र सरकार कडून अनुदान वाढ केली आहे सांगत आहेत . जर खत नियंत्रित दरात खते मिळत नसतील तर नियंत्रण एमआरपी दर ठेऊ नये सरकारने अशी सर्व शेतकरी उत्पादक यांची भावना झाली आहे .
याबाबत त्वरित केंद्र सरकारकडे आपण शेतकऱ्याची तक्रार वजा सूचना कळवावी ही विनंती
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा