Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १२ जून, २०२२

सापळा रचून अवैधरित्या गुरांची होणारी वाहतूक थाळनेर पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांनी रोखली



शिरपुर प्रतिनिधी शिरपूर: तालुक्यातील थाळनेर येथे अवैधरित्या गुरांची होणारी वाहतूक पोलिसांनी पकडली.यावेळी वाहनाची तपासणी करून गुरांची सुटका केली.थाळनेरचे सहायक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरुन सापळा रचून अवैद्य गुरांचे वाहतूक करणारा ट्रक थांबविला.
वाहन थांबवून तपासणी केली असत या वाहनात १२ गुरे आढळून आली त्यांची अवैधरित्या शिरपूरकडून चोपडाकडे वाहतूक करून घेऊन जात होते. 

या कार्यवाहीत ३ लाख ३३ हजार रुपये किमतीची गुरे व १५ लाख रुपये किमतीचा ट्रक असे एकूण १८ लाख ३३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.याबाबत फरमान खान कल्लू खान,मंनवर सगिर (दोघे रा.हसनपूर लुहारी,जि.शामला,उत्तर प्रदेश ) याचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध