Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १४ जून, २०२२

शिरपूर तालुक्यातील तोंदे येथील विकास सोसायटीत जनशक्ती विकास पॅनलने निवडणुकीत विजय



शिरपूर: प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील तोंदे येथील विकास सोसायटीत जनशक्ती विकास पॅनलने निवडणुकीत विजय मिळवला आहे चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत जनशक्ती विकास पॅनल ने ७ जागा पटकावल्या आहेत.तोंदे विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक दिनांक १२ जून रोजी घेण्यात आली.निवडणुकीत १३ जागांसाठी सदर निवडणूक घेण्यात आली.विकास सोसायटीत जनशक्ती विकास पॅनल व विकास पॅनल मध्ये खरी लढत झाली.या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर चुरस निर्माण झाली होती.यात जनशक्ती विकास पॅनल ने ७ जागा पटकावत विकास सोसायटीत मालकीचे
विजय मिळवला आहे.

जनशक्ती विकास पॅनलने माजी जिल्हा परिषद सदस्य रुपसिंग महारू चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढविण्यात आली.यात राहुल रूपसिंग चौधरी धनराज ताराचंद चौधरी,कांतीलाल जगन्नाथ पाटील साहेबराव देवराम पाटील,बापू बाबूराव पाटील,झिंगा नगा पारधी,राहुल चौधरी यांनी विजय मिळवला आहे.

माजी जिल्हा परिषद सदस्य रूपसिंग चौधरी यांचे चिरंजीव राहुल चौधरी हे
इतर मागासवर्गीय गटातून व जनरल गटातून अशा दोन्ही ठिकाणी निवडून आले आहेत.विकास सोसायटीत जनशक्ती विकास पॅनल ने मिळवलेल्या या विजयाबद्दल माजी मंत्री आ.अमरिशभाई पटेल,खासदार हीना गावित,आ.काशीराम पावरा,जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे , उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल,माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण,माजी जिल्हा परिषद सदस्य रूपसिंग चौधरी यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध