Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ६ जून, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिरपुर तालुक्यात माळी समाजातील वरवाडे येथील पहिली महिला नायब तहसिलदार पदी कु.बेला सोनवणे निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार संपन्न
शिरपुर तालुक्यात माळी समाजातील वरवाडे येथील पहिली महिला नायब तहसिलदार पदी कु.बेला सोनवणे निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार संपन्न
शिरपुर प्रतिनिधी:शिरपुर तालुक्यातील माळी समाजातील वरवाडे येथील प्रथम महिला अधिकारी,सोनवणे परिवारातील शिरपुर वरवाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष काशिनाथ डिंगबर माळी यांची पुतणी,शांतीलाल डिंगबर माळी व शि.व.न.पा.माजी नगरसेविका सौ.सुंनदा शांतीलाल माळी यांची जेष्ठ सुकन्या कु.बेला शांतीलाल सोनवणे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नायब तहसिलदार पदी निवड झाल्याबद्दल संत सावता माळी समाज मंदीर ट्रस्ट व समस्थ ग्रामस्थ वरवाडे मार्फत दि.४/६/२०२२ रोजी संध्या.७:३५ वा संत सावता माळी चौक येथे प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत भव्य नागरी सत्कार करण्यात आला.खर म्हणजे खडतर प्रवास आता सुरु होईल,
काम करतांना निडर,निसंकोच,
संयमपणे जबाबदारी पार पाडावी,अनेक अडचणीवर मात करुन आपला वरदहस्त कायम ठेवावा,जनसामांन्यांचा प्रश्न तातडीने सोडवावाअसेही मान्यवरांनी सांगीतले. सत्काराला उत्तर देतांना कु.बेला सोनवणे म्हणाल्या मी या पदावर पोहोचली याचे श्रेय फक्त आई-वडील होय.माझा एकच ध्यास होता तो आज पुर्ण झाल्याचा मनस्वी आनंद आहे. स्पर्धात्मक परिक्षेत युवा युवतींनी निराश न होता जिद्द,चिकाटी,परिश्रम व मेहनत केल्यास आपणही यश संपादन करु शकता असेही त्यांनी सांगीतले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिरपुर आमदार मा.काशिराम पावरा यांनी भुषविले होते.
यावेळी युवकांचे नेते,सुतगिरणीचे चेअरमन तथा शि.व.न.परिषदेचे उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल,तहसिलदार आबा महाजन,पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख,
शि.व.न.पा.माजी नगराध्यक्ष,विद्यमान नगरसेवक रावसाहेब प्रभाकर चव्हाण,अॅड.सुरेश सोनवणे,माजी उपनगराध्यक्ष सुरेश बागुल,माजी उपनगराध्यक्ष काशिनाथ डिगंबर माळी,माजी उपनगराध्यक्ष मा.वासुदेव देवरे माजी नगरसेवक पंढरीनाथ सोमा माळी,
शिरपुर विकास सोसायटीचे संचालक उत्तमराव माळीसर,कु.बेला यांचे वडील शांतीलाल डिगंबर माळी,आई शि.व.न.पा.माजी.नगरसेविका सुनंदा शांतीलाल माळी,शि.व.न.पा.नगरसेविका चंद्रकला संतोष माळी,नगरसेवक दिपक महादु माळी,मांडळचे भटु माळी, प्रास्ताविक वासुदेव देवरे यांनी केले मनोगत आबा महाजन,रविंद्र देशमुख साहेब यांनी केले प्रमुख अतिथीमार्फत विशेष कु.बेला माळीचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष मोतीलाल माळी,वसंत देवरे छगनदादा माळी,माजी नगरसेवक काशिनाथ सोमा माळी,दगा माळी,राजेश सोनवणे,नाना माळी,आर आर माळीसर,तंटामुक्ती वाघाडी अध्यक्ष श्रीराम माळी,अ.भा.माळी महासंघ जिल्हा सदस्य जी.व्ही.पाटीलसर, शिरपुर तालुकाध्यक्ष सुनिल माळी,जिल्हा सचिव भरत रोकडे,कर्मचारी आघाडी अध्यक्ष अविनाश माळी भाटपुरा,राजधर माळी,सुभाष माळी,किशोर माळी कळमसरे,बाबुलाल माळी,मोरे साहेब, माळी महासंघ जिल्हा सदस्य आर.जे.सोनवणेसर,जितेंद्र सुर्यवंशी,सुधिर सुर्यवंशीसर थाळनेर,सुर्यवंशीसर,नामदेव माळी,संतोष चिंतामण,लक्ष्मण महाराज,डाॅ,वाडीले,पुंडलिक माळी,महादु माळी,राहुल देवरे,करंकाळ वकील,जाधव साहेब,राजेश पगारे,नाना वायरमण,
साहेबराव माळी श्रावण माळी,हेंमत माळीसर,तसेच या सर्वांनी कु.बेला माळीचा सत्कार केला विशेष संत सावता माळी हरिपाठ महिला मंडळातर्फे कु.बेला माळीचा सत्कार करण्यात आला अध्यक्ष भाषणात आमदार पावरा यांनी कु.बेला माळीचे यशा बद्दल कौतुक केले आपली ड्युटी करतांना निडर होवुन सामान्य माणसांचे सहकार्याची भावना ठेवुन कर्तव्य करत राहणे तसेच संत सावता माळी भजनी मंडळ ,संत सावता माळी समाज मंदीर ट्रस्ट व ग्रामस्थ वरवाडेतर्फे कु.बेला माळीचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या सुत्रसंचालन बापु मास्तर यांनी केले युवराज माळीसर यांनी आभार मानले या कार्यक्रमास संत सावता माळी समाज मंदीर ट्रस्ट संचालक सचिव अधिकार माळी,सहसचिव संतोष महारु माळी,संदिप देवरे,रविंद्र माळी,वसंत माळी,भिमराव माळी,हिरालाल माळी,बापु मास्तर,तसेच भालेराव माळी,पत्रकार युवराज माळीसर,योगेश राजपुत,पत्रकार सतिष पाटील,जय देवरे,भिमराव देवरेसर,पत्रकार भैय्या माळीसर,हिरामण माळी,विजय माळीसर,रविंद्र माळीसर,प्रभाकर माळी,दिलीप बेलदार,भुषण माळी,अशा अनेकांचे विशेष सहकार्य लाभले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा