Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २७ जून, २०२२

सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती सेनेचा राज्य प्रदेश कार्यकारणी साक्री तालुक्यातील भांडणे चा गिरीश सोनवणे व जेबापूर चे विलास भंदाणे यांची सर्वानुमते निवड



साक्री :- राज्यातील शेतक-यांच्या न्याय हक्क व शेतीमालास योग्य हमी भाव मिळावा या उद्देशाने स्थापन झालेल्या रयत क्रांती पक्षांची राज्यस्तरीय नवीन कार्यकारिणी नुकतीच संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी घोषित केली असून या कार्यकारिणीत प्रदेश उपाध्यक्ष म्हणून साक्री तालुक्यातील भाडणे येथील शेतकरी शिरीष आनंदराव सोनवणे यांची तर जेबापूर येथील विलासराव ओंकार भदाणे यांची जळगाव,  नंदुरबार जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ति करण्यात आली आहे.संपर्क प्रमुख विलासराव भदाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार कार्यकारिणी अशी की,रयत क्रांती पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदी भानुदास शिंदे, उपाध्यक्षपदी शिरीष आनंदराव सोनवणे, युवक आघाडी अध्यक्षपदी विजय पाटील, पक्ष प्रवक्ते म्हणून दीपक भोसले, प्रशांत ढोरेपाटील,रयत क्रांती पक्ष 
कार्यकारिणी रयत क्रांती संघटना प्रदेश अध्यक्षपदी दिपक पगार, नाशिक ,
रयत क्रांती युवा आघाडी प्रदेश अध्यक्षपदी
पांडुरंग शिंदे,नांदेड,रयत क्रांती महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष म्हणून सौ.निताताई खोत, नवी मुंबई,रयत क्रांती शिक्षक आघाडी अध्यक्ष म्हणून एन.डी चौगुले सर,रयत क्रांती व्यापारी आघाडीच्या अध्यक्षपदी  जगदीश आबा पाटील, धुळे , उपाध्यक्ष म्हणून सचिन पगार नाशिक,विभागीय अध्यक्षपदी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलावडे व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून डॉ.श्री.अजय पाटील, विदर्भ अध्यक्षपदी ॲड.आशिष वानखेडे,प्रवक्तेपदी प्रा. सुहास पाटील ,जितूभाऊ अडेलकर व लालासाहेब पाटील,
कोअर कमिटी राजकिय व्यवहार समितीपदी शिवनाथ जाधव, (अध्यक्ष), आ. सदाभाऊ खोत सदाभाऊ, सागर खोत,दिपक पगार,दिपक भोसले,सुहास पाटील, प्रशांत पाटील, भानुदास शिंदे,पांडुरंग शिंदे,
एन.डी.चौगुले,अजय बागल,सौ. निताताई खोत,जितुभाऊ अडेलकर याची नियुक्ति करण्यात आली. या कार्यकारिणीमध्ये साक्री तालुक्यातील शिरीष आनंदराव सोनवणे व विलासराव भदाणे यांची नियुक्ति झाल्याबद्दल भाडणे गाव आणि पंचक्रोशीतील नागरिकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे

महाराष्ट्र सारथी वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध