Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २८ जून, २०२२

भर पावसात साक्री पोलीस स्टेशन बाहेर मृतदेह ठेऊन संतप्त नातेवाईकांची आरोपीला शिक्षेची मागणी,मात्र आरोपी फरार असल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण



शेतीच्या बांधावरुन झालेल्या वादात डोक्यात फावड्याचा दांड्याचा जबर मार लागून मृत पावलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह संतप्त नातेवाईकांनी आज सायंकाळी भर पावसात साक्री पोलीस ठाण्याबाहेर ठेवला. आणि जोपर्यंत मारेकऱ्यांना पोलीस अटक करत नाही आणि त्यांच्यावर 302 कलमान्वये गुन्हा दाखल करत नाही, तोपर्यंत मृतदेह पोलिस ठाण्याबाहेरून उचलणार नाही अशी भूमिका मृत शेतकऱ्याच्या संतप्त नातेवाईकांनी घेतली.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातल्या नाडसे गावात शेतातील रस्त्याच्या वादात शेतकरी देविदास चैत्राम नेरकर यांच्या डोक्यात संशयतानी फावड्याच्या दांड्याने जोरदार मार केल्याने शेतकरी देविदास नेरकर जखमी असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु गेल्या आठ दिवसांपासून उपचार घेत असताना उपचारादरम्यान आज अखेर जखमी शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यापूर्वी मारामारी झाल्यानंतर संबंधितांवर पोलिसांनी कृपादृष्टी दाखविल्याने ते अद्यापही फरार असल्याचा आरोप देखील संतप्त नातेवाइकांनी यावेळी केला आहे. मात्र यावेळी DYSP मैराळे यांनी मध्यस्थी करत आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह अंत्यविधीसाठी नेला.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध