Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २६ जुलै, २०२२
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यात 108 रुग्णवाहिकांचे वाजले 3/13 लोकप्रतिनिधींचे याकडे सर्रास दुर्लक्ष :-
साक्री तालुक्यात 108 रुग्णवाहिकांचे वाजले 3/13 लोकप्रतिनिधींचे याकडे सर्रास दुर्लक्ष :-
साक्री प्रतिनिधी:अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती 108 ची वाट लावणार साक्री तालुका हा भौगोलिक दृष्ट्या संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठा असून सदर तालुक्यासाठी 108 रुग्णवाहिका फक्त चार असून त्याही वेळेवर उपलब्ध होत नाहीत असे तालुक्यातील तमाम जनतेचे म्हणणे आहे.
या गोष्टीचा प्रत्यय मी स्वतःअनिल देसले तसेच प्रवीण बोरसे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे पदाधिकारी यांनीही घेतला त्याचे कारण ही तसेच,तालुक्यातील मौजे प्रतापूर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.राहुल गांगुर्डे यांचा मला फोन आला की आदिवासी वस्तीतील एका 6 वर्षाच्या कु.कृष्णा विकास गायकवाड या बालकाला पिसाळलेल्या कुत्र्याने चेहऱ्याला व डोक्याला मोठ्या प्रमाणात चावा घेतलेला आहे.
तरी आपण कासारे प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन त्या बालकाचा उपचार करून घ्यावा यासाठी मी कासारे आरोग्य केंद्रात दूरध्वनीवर संपर्क केला असता सदर मुलाला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेला असल्याने त्याला ग्रामीण रुग्णालय साक्री येथे रेफर करण्यात आले.मला लगेच प्रतापूर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. धनराज गांगुर्डे (बंडू भाऊसाहेब) यांचा फोन आला की हर्षल ठाकरे,अमोल गांगुर्डे, मनोज शिंदे व त्या मुलाचे वडील विकास गायकवाड हे बालकाला घेऊन साक्री ग्रामीण रुग्णालयात येत आहेत तरी आपण तातडीने साक्री ग्रामीण रुग्णालयात पोहोचा.आम्ही तेथे गेल्यावर त्या बालकाला ग्रामीण रुग्णालयातील डॉ. विवेक जाधव यांनी स्वतः चेक करून पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने या पेशंटला धुळे जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला त्याप्रमाणे त्यांनी रेफरचिट ही तयार करून दिले आम्ही दवाखान्याच्या बाहेर येऊन 108 रुग्णवाहिकेला कॉल केला असता तिकडून पेशंटचे नाव, वय, पत्ता, आपण कोण बोलतात या सर्व गोष्टींची विचारपूस केल्यानंतर त्यांनी कळविले की निजामपूर येथील 108 पेशंट घेऊन गेलेली आहे.
पिंपळनेर दहिवेल 108 रुग्णवाहिका नादुरुस्त आहेत,तर साक्री येथील 108 रुग्णवाहिका धुळ्यावरून आता निघाली आहे साधारणता एक दीड तास साक्री येथे पोहोचेल असे उडवा उडवी चे उत्तरे देण्यात आले.बालक हा आदिवासी कुटुंबातील असल्याने त्याची परिस्थिती अगदी हलाखीची होती.त्या बालकाचे अतोनात हाल होत असल्याकारणाने हर्षल ठाकरे,अमोल गांगुर्डे,मनोज शिंदे यांनी बालकाच्या वडिलांना काही रुपयांची मदत करून प्रायव्हेट वाहनाने धुळे येथे पाठविले. आम्ही ग्रामीण रुग्णालय साक्री येथे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत थांबलो परंतु 108 रुग्णवाहिका कार्यालयाकडून तदनंतर कुठल्याही प्रकारची विचारपूस करण्यात आलेली नाही याचा अर्थ तालुक्यात 108 रुग्णसेविकांचा 3/13 वाजलेले आहेत हे त्रिवार सत्य आहे. या सर्व गोष्टींकडे तालुका वैद्यकीय अधिकारी, तसेच तालुक्यातील तमाम लोकप्रतिनिधींनी वैयक्तिक लक्ष घालण्याची गरज आहे.
तसेच 8 दिवसाच्या आत 108 रुग्णवाहिकेंच्या कामात सुधारणा झाली नाही तर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष श्री..अनिल दादा देसले,महाराष्ट्र प्रदेश संघटक श्री प्रवीण दादा बोरसे हे 108 रुग्णवाहिकेच्या प्रादेशिक कार्यालय मुंबई येथे तक्रार दाखल करणार आहेत.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा