Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २६ जुलै, २०२२

प्रतीकोकण दिवा नगरीत ३० जुलै ला शक्ती तुऱ्याच्या सामन्याचे आयोजन कार्यक्रमाचे खास आकर्षण दिवाडकर "महिला नृत्य कलापथक" रोहिणी म्हसळा



प्रतीकोकण दिवा नगरीत अक्षय कदम, मार्गदर्शक उमाजी शिंदे,अमित भुवड प्रवीण टोळे,दिंगबर शितप,लक्ष्मण जाधव,सुदर्शन जाधव यांच्या आयोजनामधून शक्ती तुऱ्याच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.शक्तीवाले शाहिर कॅसेट फेम शाहिर प्रकाश चव्हाण (शाखा-दिवाडकर नृत्य कलापथक रोहिणीगाव म्हसळा रायगड ) आणि तुरेवाले शाहिर कॅसेट फेम शाहिर राजू धावडे (शाखा-ओम साई नाच मंडळ अंबरनाथ बारकूपाडा) यांची शनिवार दिं.30 जुलै 2022 रोजी शक्ती तुऱ्यारुपी जुगलबंदी आकांशा हॉल,दिवा आगासन रोड,बी.आर.नगर दिवा पूर्व येथे ठेवण्यात आली आहे. 

कार्यक्रम रात्री ७.३० वाजता सुरू होईल.या कार्यक्रमाचे खास आकर्षक म्हणजे रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील फेमस असलेले दिवाडकर महिला नृत्य कलापथक गाव रोहिणी प्रतीकोकण दिवा नगरीत आपली कला सादर करणार आहे.

तरी रसिक प्रेक्षकांनी या कलेचा आनंद घेण्यासाठी आणि शक्ती तुऱ्याचा जंगी सामना पाहण्यासाठी जरूर उपस्थित रहा असे आव्हान आयोजक यांच्याकडून करण्यात आले आहे.तिकीट साठी संपर्क अक्षय कदम-८३६९८६७६९९,
सुदर्शन जाधव-९१६७८२१२७६


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध