Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १६ जुलै, २०२२
Home
/
Unlabelled
/
निर्दोष आरोपींना या प्रकरणातून बाहेर काढून त्यांच्या कुटुंबांना न्याय द्यावा खरे गुन्हेगार शोधा मानव अधिकार यांचा धुळे पोलीस अधीक्षकांना निवेदन
निर्दोष आरोपींना या प्रकरणातून बाहेर काढून त्यांच्या कुटुंबांना न्याय द्यावा खरे गुन्हेगार शोधा मानव अधिकार यांचा धुळे पोलीस अधीक्षकांना निवेदन
शिरपूर प्रतिनिधी:मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट नई दिल्ली यांच्या माध्यमातून माननीय पोलीस अधीक्षक धुळे यांना शिरपूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 327/ 222 मधील फिर्यादी विरुद्ध तक्रारी अर्ज देण्याबाबत निवेदन देण्यात आले.
निवेदनात अर्जदार सुधा किशोर चौधरी महाराष्ट्र आरटीआय महासचिव महिला आघाडी धुळे जिल्हा अध्यक्ष असून सामाजिक कार्यकर्ता देखील असून शिरपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 327/२०२२भा.द.वि कलम३९२.४५२.३४८.५०६.५०७.३४.व महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 कलम ३९व४५ प्रमाणे श्री मनोज गुलाबराव पाटील.संजय सुनील बाविस्कर.भूषण गोपाल पाटील.महेश कोळी.अमोल गोपाल सोनवणे.सर्व राहणार शिरपूर यांच्याविरुद्ध कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे.
परंतु वरील लोकांच्या सदर गुन्ह्याशी काही एक संबंध नाही वरील सर्व इसम हे हातमजुरी व दैनंदिन रोजगार व छोटे व्यावसायिक असून त्यांनी या केसमधील फिर्यादी कुणाल हरीलाल जुलवाणी यांच्याशी कुठलाही आर्थिक व्यवहार अथवा पैशांची देवाण-घेवाण अथवा व्याज भत्ता व्यवहार केलेला नाही.तरीही फिर्यादी याने वरील इसमांना या संबंधित खोटी केस मध्ये गोवले आहे.
या गुन्ह्यामधील फिर्यादी कुणाल हिरालाल जुलवाणी राहणार शिरपूर हा मोबाईल व्यवसाय असून व्यवसायामुळे कर्जबाजारी झालेला आहे.फिर्यादी कुणाल याला दारू पिण्याचे व्यसन असून दारू व सट्टा व्यवसायापाई मालमत्ता गमवुन कर्जबाजारी झालेला आहे.व शिरपूर शहरात अनेक मोठे व्यवसायिकांकडे त्याचे देणे आहे . सदरील मोठे व्यवसायिक एक पैशांची मागणी करत असल्यामुळे व त्यांना पैसे न देणे लागू मुळे फिर्यादी कुणाल जुलवाणे याने या गुन्हा अंतर्गत जवळजवळ 25 लोकांवर सावकारी कायदा अंतर्गत खोटा गुन्हा दाखल केलेला आहे.
वरील नमूद आरोपी मनोज गुलाबराव पाटील.संजय सुनील बाविस्कर.भूषण गोपाल पाटील.महेश कोळी.अमोल गोपाल सोनवणे.हे सर्व हात मजूर असल्याने सदर कोटा गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांच्यावर उपवासाची वेळ आलेली आहे त्यामुळे वरील लोकांचे परिवारातील लोक बायको लहान मुले व मतारी आई वडील यांच्यावर उपासमारीची वेळ आल्यामुळे व खोटा गुन्हा दाखल झाल्यामुळे माझ्याकडे न्याय होण्यासाठी आलेले असून सदर गुन्हा पहिले असता असे दिसून येते की फिर्यादी हा व्यसनाबाई कर्जबाजारी झाल्यामुळे व लोकांचे देणे लागू नये म्हणून वरील खोटा गुन्हा दाखल केलेला आहे.
फिर्यादीचे वडील हिरालाल जुलवाणी हे सरकारी शाळेत मुख्याध्यापक असून फिर्यादीचे काका राजेश झुलवाने हे पत्रकार आहेत व फिर्यादी हा कर्जबाजारी मुळे जीवाचे बरे वाईट करण्याची व मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता असल्यामुळे फिर्यादीने त्यांच्यासोबत वरील लोकांना विरुद्ध हा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे त्यामुळे सदर प्रकरणाशी कसूर चौकशी होऊन फिर्यादी कुणाला हिरालाल याचे वडील हिरालाल जुलवाणी काका राजेश जुलवाणी यांनी पत्रकार असल्यामुळे प्रशासनावर दबाव टाकून गैरवापर करून दाखल केलेल्या खोट्या फिर्यादीची मुळापासून चौकशी करून वरील निर्दोष आरोपींना या प्रकरणातून बाहेर काढून त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळावे व फिर्यादी कुणाल हिरालाल जुलवाणी यांचे वडील हिरालाल जुलवानी काका राजेश जुलवाणी यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी.व योग्य तो बंदोबस्त करून कठोर शासन करण्यात यावे ही नम्र विनंती.
यावेळी मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट नई दिल्लीचे.महिला आघाडी महाराष्ट्र आरटीआय महासचिव.सुधा किशोर चौधरी.मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट युवा महासचिव दीपक शिवाजी चोरमले.धुळे जिल्हा महिला अध्यक्ष चंद्रकला ताई पाटील.धुळे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील.धुळे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष विभाभाई जोगराणा.शिरपूर तालुका प्रमुख वाजिद मलक.दिपक धनगर विशाल धनगर.उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा