Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ८ जुलै, २०२२

निवडणूक आयोगाकडून राज्यातील निवडणूक जाहीर



महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत . आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार दिनांक 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे.
तर,19 ऑगस्टला लगेचच निकाल देखील लागणार आहे.

आयोगाच्या निर्देशानुसार 20 जुलै रोजी जिल्हाधिकारी संबंधित जिल्ह्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील . राज्यातील पुणे,सातारा,सांगली, सोलापूर,कोल्हापूर,नाशिक,धुळे , नंदुरबार,जळगाव,अहमदनगर ,
औरंगाबाद,जालना,बीड,उस्मानाबाद,लातूर,अमरावती आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि एकूण चार नगरपंचायतींच्या निवडणूका जाहीर करण्यात आल्यात.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध