Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, ९ जुलै, २०२२
नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर, ‘या’ ठिकाणी उडणार राजकीय धुरळा..!!
राज्याच्या राजकारणातून महत्वाची बातमी आहे..राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला. राज्य निवडणूक आयोगाने आज (ता. 8) या निवडणुकांच्या घोषणा केली. पर्जन्यमान कमी असलेल्या राज्यातील 17 जिल्ह्यांतील 92 नगरपालिका व 4 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे..
नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकींसाठी 18 ऑगस्टला मतदान व दुसऱ्या दिवशी 19 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे….मात्र, ओबीसीं’च्या राजकीय आरक्षणाचा तिढा कायम असून, या निवडणुका, ओबीसी’ आरक्षणाशिवायच होणार असल्याचे बोलले जाते.निवडणुक कार्यक्रम जाहीर झालेल्या ठिकाणी आजपासूनच (ता. 8) आचारसंहिता लागू झाली आहे..निवडणुकीचे वेळापत्रक
20 जुलै – जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील.
22 ते 28 जुलै – संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरणे
29 जुलै – छाननी व वैध नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार
4 ऑगस्ट – अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार.
18 ऑगस्ट – मतदान
19 ऑगस्ट – मतमोजणी
या नगरपालिकांच्या निवडणुका‘अ’ वर्ग
भुसावळ (जि. जळगाव), बारामती (जि. पुणे), बार्शी (जि. सोलापूर), जालना (जि. जालना), बीड (जि. बीड), उस्मानाबाद (जि.उस्मानाबाद)
‘ब’ वर्गनाशिक – मनमाड, सिन्नर, येवला
धुळे – दोंडाईचा-वरवाडे, शिरपूर-वरवाडे
नंदुरबार – शहादा
जळगाव- अमळनेर, चाळीसगाव
अहमदनगर- संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर
पुणे – चाकण, दौंड
सातारा – कराड, फलटण
सांगली – इस्लामपूर, विटा
सोलापूर – अक्कलकोट, पंढरपूर, अकलूज (नवनिर्मित)
कोल्हापूर – जयसिंगपूर
औरंगाबाद – कन्नड, पैठण
बीड – अंबेजोगई, माजलगाव, परळी-वैजनाथ
लातूर – अहमदपूर
अमरावती – अंजनगाव-सुर्जी
‘क’ वर्ग
नाशिक- चांदवड, नांदगाव, सटाणा, भगूर
जळगाव – वरणगाव, धरणगाव, एरंणडोल, फैजपूर, पारोळा, यावल
अहमदनगर – जामखेड, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, राहाता, राहुरी
पुणे – राजगुरूनगर, आळंदी, इंदापूर, जेजुरी, सासवड, शिरुर
सातारा – म्हसवड, रहिमतपूर, वाई
सांगली – आष्टा, तासगाव, पलूस
सोलापूर – मोहोळ, दुधनी, करमाळा, कुर्डुवाडी, मेंदगी, मंगळवेढा, सांगोला
कोल्हापूर – गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, मुरगूड, वडगाव
औरंगाबाद – गंगापूर, खुलताबाद
जालना – अंबड, भोकरदन, परतूर
बीड – गेवराई, किल्ले धारुर
उस्मानाबाद – भूम, कळंब, मुरुम, नळदुर्ग, उमरगा, परांडा, तुळजापूर
लातूर – औसा, निलंगा
अमरावती – दर्यापूर
बुलडाणा – देऊळगाव राजा
4 नगरपंचायतीअहमदनगर – नेवासे
पुणे/आंबेगाव – मंचर (नवनिर्वाचित)
पुणे/बारामती – माळेगाव बुद्रुक (नवनिर्वाचित)
सोलापूर/मोहोळ – अनगर,
ओबीसी’ आरक्षणाचे काय..?
ओबीसी’आरक्षण रद्द करण्यात आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या होत्या..अखेर हा मुद्दा सुप्रिम कोर्टात गेला..पावसामुळे जे जिल्हे प्रभावित होणार नाहीत,अशा ठिकाणी प्रत्यक्ष निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रिम कोर्टाने 17 मे 2022 रोजी दिला होता.सुप्रिम कोर्टाच्या या आदेशानुसार भारतीय हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत..ओबीसी आरक्षणाचा मुद्दा कायम असताना, निवडणुका जाहीर करण्यात आल्या..त्यामुळे या निवडणुका ओबीसी आरक्षणाविनाच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बेटावद, ता. शिंदखेडा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राष्ट्रीय ...
-
नवागत विद्यार्थ्यांचे मिरवणुकीने स्वागत बेटावद शिंदखेडा तालुक्यातील मुडावद येथील जिल्हा परिषद आदर्श शाळा, मुडावद येथे आज शाळा शुभारंभ दिन मो...
-
दिनांक 8 जून 2025 रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, साक्री यांच्या कार्यालया मार्फत खरीप हंगामपूर्व ग्रामस्तरीय बैठक मौजे शेणपूर, तालुका सा...
-
:बेटावद,शिंदखेडा :- तालुक्यातील पाष्टे या गावी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जनतेच्या सुखासाठी आयुष्यभर झगडणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
-
अमळनेर : बेकायदेशीर गावठी पिस्टल बाळगणाऱ्या पैलाड येथील शिवाजी नगर भागातल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक करून त्याच्या जवळील २० हजार ५०० रुपय...
-
अमळनेर : येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते समाधान एकनाथ मैराळे यांना शनिवारी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात मानद डॉक्टरेड पदवी प्रदान करण...
-
खुनाचा गुन्हा दाखल ,शोधासाठी पोलीस पथक रवाना अमळनेर : तालुक्यातील पातोंडा येथील विद्युत ठेकेदाराच्या भावाला लोखंडी पाईप आणि लोखंडी पहार ने झ...
-
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (पीएमएवाय) महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एकही लाभार्थी बेघर रा...
-
निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण व नारपार नदीजोड प्रकल्पासाठी दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयात झाली यशस्वी बैठक ! अमळनेर-उत्तर महाराष्ट्रातील सि...
-
नाशिक प्रतिनिधी :नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या डिके नगर पोलीस चौकीत रात्री अकरा वाजेच्या सुमारास ४ ते ५ पोलीस कर्मचारी ओली पार्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा