Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ११ जुलै, २०२२
Home
/
Unlabelled
/
पोलिसाचा मोठ्या प्रमाणावर कारवाईचा धडाका सुरू धुळे जिल्ह्यात शंभर दिवसांत 64 सावकारांवर कारवाई
पोलिसाचा मोठ्या प्रमाणावर कारवाईचा धडाका सुरू धुळे जिल्ह्यात शंभर दिवसांत 64 सावकारांवर कारवाई
धुळे प्रतिनिधी:पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाईचा धडाका केला सुरू जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 100 दिवसात तब्बल 64 सावकारांवर 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी सहा सावकारांना अटक करण्यात आली आहे धुळे शहरातील रहिवासी असणाऱ्या जयेश दुसाने यांनी अवैध सावकार राजेंद्र बंब याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती .
दुसाने हे बंब याच्याकडे मागील 10 वर्षांपासून काम करत होते.त्यानंतर पोलीस प्रशासनाने अवैध सावकारांच्या मुसक्या आवळण्याची धुळ्यात मोहीम सुरू केली.राजेंद्र बंब यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई सुरू केल्यानंतर त्यांच्याकडून कोट्यावधी रुपयांचे घबाड हाती लागले.त्याआधी 26 मार्च रोजी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात अवैध सावकारी विरोधात पहिला गुन्हा दाखल झाला होता.यानंतर खाजगी सावकारी प्रकरणी विविध गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली.पोलीस प्रशासनाने देखील या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत कारवाईचा धडाका सुरू केला.यामुळे 26 मार्चपासून सुरू झालेल्या गुन्ह्यानंतर गेल्या शंभर दिवसात तब्बल 64 जणांवर 15 गुन्हे दाखल करण्यात आले असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या कारवाईत चार महिलांचा देखील समावेश असून यातील सर्वाधिक गुन्हे हे व्यवसाय वाढीसाठी घेतलेल्या कर्जातून दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे . धुळे शहरातील अवैध सावकार राजेंद्र बंब याच्यावर सहा गुन्हे दाखल झाले असून एक अदखलपात्र स्वरूपाचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सगळ्या कारवाईत आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने राजेंद्र बं यांच्याकडील मालमत्ता जप्त केली आहे.पोलिसांनी बंब याच्याकडून आतापर्यंत 12 कोटी 25 लाख 10 हजार 760 रुपये रोख रक्कम , तर 6 कोटी 20 लाख 4 हजार 444 रुपयांचे सोने , 5 लाख 27 हजार 411 रुपयांचे चांदी , आणि 3 हजार मुदत ठेवीच्या पावत्या जप्त केल्या आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा