Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १० जुलै, २०२२
Home
/
Unlabelled
/
देवशयनी आषाढी एकादशी निमित्त श्री भूपेशभाईंची बाळदे येथील विठ्ठल मंदिरात पूजा...!
देवशयनी आषाढी एकादशी निमित्त श्री भूपेशभाईंची बाळदे येथील विठ्ठल मंदिरात पूजा...!
शिरपूर प्रतिनिधी: तालुक्यातील बाळदे हे प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. आज आषाढी एकादशी निमित्त येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शिरपूर तालुक्याचे धार्मिक श्रद्धाळू नेता म्हणून ओळख असणारे श्री भूपेशभाई पटेल यांच्या शुभहस्ते पूजा करण्यात आली.
सकाळपासूनच तालुक्यातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी बाळदे येथे हजेरी लावली. यात प्रामुख्याने आमदार श्री काशिरामदादा पावरा, जि प अध्यक्ष डॉ तुषारभाऊ रंधे,मा नगरसेवक श्री अशोकबापू कलाल,मा नगराध्यक्ष रावसाहेब श्री प्रभाकर चव्हाण,कृऊबा सभापती नानासो श्री नरेंद्रसिंग सिसोदिया, भाजपा उपजिल्हाधक्ष श्री के डी पाटील सर,वनावल गट जि प सदस्य श्री भरतबापू पाटील, आरसीपटेल शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री राजूभाऊ भंडारी,मा पं स उपसभापती श्री जगतसिंग राजपूत, पिपल्स बँक संचालक श्री संजयभाऊ चौधरी,कॉन्ट्रॅक्टर श्री निलेश पाटील, सरपंच महासंघ शिरपूर तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया, सपोनि श्री फड साहेब, डॉ श्री विजेंद्र पाटील बाळदे (माऊली हॉस्पिटल शिरपूर), दीपक गिरासे बोरगांव ई नी मंदिरात दर्शनासाठी भेट दिली.
विठ्ठलधाम ट्रस्ट अध्यक्ष तथा माजी आमदार नानासाहेब श्री संभाजीराव पाटील, ट्रस्टी, मा जि प सदस्य श्री जितेंद्र संभाजीराव पाटील, पं स सदस्य श्री निंबादादा पाटील, मा पं स सदस्य श्री निलेशदादा पाटील, ट्रस्टी दुष्यन्त मनोहर पाटील यांनी आलेल्या भाविकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
नेहमीच सामाजिक व धार्मिक कामांसाठी लाखोची मदत करणारे दानशूर व्यक्तिमत्व श्री भूपेशभाई पटेल साहेबांनी बाळदे मंदिरासाठी मदत म्हणून नवीन भक्ती निवास व भक्तांसाठी बाथरूम तसेच स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय ई साठी निधी मंजूर केला.
विठ्ठलधाम ट्रस्ट बाळदे तर्फे श्री भूपेशभाई पटेल यांचे आभार मानण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा