Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १५ जुलै, २०२२
Home
/
Unlabelled
/
आ.जयकुमारभाऊ रावल यांच्या पाठपुराव्याला यश..! शिंदखेडा शहरांतर्गत कॉंक्रीटीकरणासाठी ५ कोटींचा निधी मंजूर सत्ताबदलताच मतदारसंघात निधीचा ओघ सुरू..
आ.जयकुमारभाऊ रावल यांच्या पाठपुराव्याला यश..! शिंदखेडा शहरांतर्गत कॉंक्रीटीकरणासाठी ५ कोटींचा निधी मंजूर सत्ताबदलताच मतदारसंघात निधीचा ओघ सुरू..
शिंदखेडा प्रतिनिधी : माजी मंत्री तथा शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमारभाऊ रावल यांच्या प्रयत्नामुळे,रावसाहेब अनिल वानखेडे यांचा पाठपुराव्यामुळे,नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधाची कामे या योजनेअंतर्गत शिंदखेडा नगरपंचायत अंतर्गत विविध कॉलन्यामध्ये कॉंक्रीटीकरणा साठी तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्यात सत्ताबदल होताच मागील अडीच वर्षापासून बंद असलेला निधीचा ओघ पुन्हा सुरू झाला असल्याची प्रतिक्रिया आ. जयभाऊ रावल यांनी दिली आहे.
यात शिंदखेडा शहरातील वॉर्ड क्र. 10 मध्ये रस्ता कॉंक्रीटीकरण करणे यासाठी 1 कोटी रुपये, वॉर्ड क्र. 11 मध्ये रस्ता कॉंक्रीटीकरण करणे यासाठी 1 कोटी 25 लक्ष ,वॉर्ड क्र 12 मध्ये रस्ता कॉंक्रीटीकरणा साठी 1 कोटी रुपये, वॉर्ड क्र 4,5,6 मध्ये रस्ता कॉंक्रीटीकरणासाठी 1 कोटी 25 लक्ष रुपये, तसेच वॉर्ड क्र13 मध्ये कॉंक्रीटीकरणा साठी 50 लक्ष रुपये , असा एकूण 5 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
मागील अडीच वर्षाच्या काळात राज्य सरकारकडून येणारा निधी बंद झाला होता परंतु राज्यात सत्ताबदल होताच पुन्हा निधीचा ओघ सुरू झाला असल्याची प्रतिक्रिया आ. रावल व गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांनी व्यक्त केली आहे.
सत्ता बदलताच मतदारसंघात निधीचा ओघ पुन्हा सुरू:आ. जयकुमारभाऊ रावल
राज्यात मागील अडीच वर्षापासून महाविकास आघाडी सरकारने निधी वाटपाबाबत दुजाभाव केला होता, वसुली शिवाय दुसरे कोणतेही काम त्यांनी केले नाही.राज्यात भाजपा सेनेची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकपयोगी कामांचा धडाका लावलेला आहे.यात पेट्रोल, डीझेल यांच्यावरील राज्य सरकारचा कर कमी करणे, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देणे, शेतकऱ्यांना कुसुम योजनेतुन व राज्यसरकार कडून सौरऊर्जा पंप उपलब्ध करून देणे अश्या कामांचा धडाका लावलेला आहे.मागील अडीच वर्षात निधी वाटपाच्या दुजाभावामुळे शिंदखेडा मतदारसंघात विकासाचा वेग मंदावलेला होता परंतु सत्ता बदल होताच अवघ्या 10 ते 15 दिवसात पुन्हा निधीचा ओघ सुरू झाला असून हा ओघ असाच सुरू राहील अशी प्रतिक्रिया माजी मंत्री
आ.जयकुमारभाऊ रावल यांनी व्यक्त केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा