Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १६ जुलै, २०२२
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील साक्री पिंपळनेर परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या परिसरात आमदारांचा पाहणी दौरा .
साक्री तालुक्यातील साक्री पिंपळनेर परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या परिसरात आमदारांचा पाहणी दौरा .
धुळे प्रतिनिधी: साक्री तालुक्यातील दहिवेल आणि परिसरात सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आमदारांनी नुकसान झालेल्या ठीकाणांचा पाहणी दौरा आयोजित केला होता.या पाहणी दौऱ्या दरम्यान नुकसान झालेल्या शेतीचे,घरांचे आणि वाहुन गेलेले पुल आणि रस्त्यांचे पंचनामे करावे असे आदेश संबधीत विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले .
साक्री तालुक्यातील दहिवेल परिसरात आणि पिंपळनेर परिसरात शेणपूर गावात देखील आमदार महोदयांनी काल भेट दिली सोमवार ( दि ११ ) रोजी अतिवृष्टी झाली.तालुक्यात उंबरपाटा १४७ मिमि. कुडाशी १२६ मिमी आणि दहिवेल येथे ११७ मिमि. पावसाची नोंद करण्यात आली होती. या धुव्वाधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिंकांचे नुकसान झाले . शेतात पाणी घुसले तर अनेकांचे घरांच्या भिंतींची पडझड झाली.तसेच मैंदाने गावाजवळ नविन पुलाच्या कामामुळे पर्यायी रस्ताच वाहुन गेल्या मुळे बंद होता.
यां सगळ्या आढावा घेत दहिवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणी घुसल्याने पडलेली संरक्षण भिंत तसेच नाल्याचे घुसलेल्या पाण्यामुळे झालेले नुकसानाची पाहणी करत आढावा घेतला तसेच जि.प. मराठी शाळेत पुराचे पाणी शिरल्याने वस्तू आणि पोषण आहार यांचा तात्काळ पंचनामा करावा . अशा सूचना आमदार मंजुळा गावीत यांची संबधीत अधिकाऱ्यांना दिल्या त्या प्रसंगी तुळशिराम गावीत , तहसिलदार प्रविण चव्हाणके , पं.सं. सभापती प्रतिभा सुर्यवंशी गटविकास अधिकारी जी.टी.सुर्यवंशी ,तालुका कृषी अधिकारी ठाकरे ,पं.स. कृषी अधिकारी नेतनराव जि.प.बांधकाम शाखां अभियंता साबळे सार्वजनिक बांधकाम अभियंता कुवर तसेच उपसरपंच रुपेश बच्छाव , हिम्मराव बच्छाव, शिवसेना युवानेते अमोल सोनवणे , ग्रा.पं.सदस्य प्रा.प्रभाकर सोनवणे, पं.स. सदस्या संगिता गावीत, सामाजिक कार्यकर्ते गणेश गावीत मैंदाने सरपंच कैलास ठाकरे , ग्रामविस्तार अधिकारी एच.एन.अहिरे , तलाठी सोमनाथ अहिरे तसेच नुकसानग्रस्त शेतकरी व नागरीक हजर होते ,
अतिवृष्टी झालेल्या देवजीपाडा येथे झालेले पिकांचे नुकसान तसेच घरांची पडझड , पाझर तलाव पाहणी दहिवेल येथील पिकांचे नुकसान घरांची पडझड , मैंदाणे पुलाच्या नुकसानीची पाहणी , काकसेवड पिकांची नुकसान तुटलेल्या फरशीची पाहणी , घरांची पडझड पाहणी , महुबंद पिक नुकसान पाहणी , सावरीमाळ आणि मळगांव येथील पिक नुकसान पाहणी असा नुकसान आढावा दौरा आमदार मंजुळा गावित यांनी केला.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - वरवाडे नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत युवा नेतृत्वाचा चे...
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा