Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २५ जुलै, २०२२

राष्ट्रपती मा.द्रोपदी मुर्म यांचा शपथविधी निमित्त नंदुरबार शहरात भाजप नेते मा.आ.गिरीशभाऊ महाजन यांच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा



भारताच्या राष्ट्रपतीपदी श्रीमती द्रोपती मुर्म यांनी आज दिनांक 25 जुलै 2022 रोजी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली असून या निमित्ताने भारतीय जनता पार्टी नंदुरबार शहराच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (जुनी नगरपालिका) येथे भाजप नेते मा.आ.गिरीशभाऊ महाजन यांच्या उपस्थितीत आनंदोत्सव कार्यक्रम आदिवासी नृत्य पथक,ढोल-ताशांच्या गजर,श्रीमती द्रोपदी मुर्म यांचे फोटो, हातात भाजपचे झेंडे, फटाक्यांची आतिषबाजी, एकमेकांना पेढे भरवीत साजरा करण्यात आला. 

यावेळी आनंद उत्सव साजरा करताना भाजपा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी,जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर सपना अग्रवाल,जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पाटील,जिल्हा उपाध्यक्ष संगीताताई सोनवणे,जिल्हा उपाध्यक्ष युवराज राजपूत,ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव प्रकाश गवळे,शहराध्यक्ष नरेंद्र माळी, जिल्हाचिटणीस पायल मोदाणी,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील,भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष संजय साठे, सहकार सेल जिल्हाध्यक्ष भीमसिंग राजपूत, व्यापार आघाडी जिल्हाध्यक्ष पंकज जैन,ट्रान्सपोर्ट सेल जिल्हाध्यक्ष विनम्र शहा, शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष बि.डी.पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष किन्नरी सोनार,आदिवासी मोर्चा शहराध्यक्ष विजय नाईक,युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश चौधरी,युवा मोर्चा तालुका सरचिटणीस प्रशांत पाटील,सहकार सेल शहराध्यक्ष रत्नदीप पाटील, अल्पसंख्यांक मोर्चा शहराध्यक्ष समीर मंसूरी,महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनीषा निकम आदी पदाधिकारी कार्यकर्ते व आदिवासी समाज बांधव-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध