Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २४ जुलै, २०२२

जनता प्रतीक्षेत...मनमानी पद्धतीने कामकाज करणारे शिंदखेडा तहसीलदार सुनील सैंदाणे यांच्यावर खरंच कारवाई होईल का ?



तरुण गर्जना वृत्तसेवा शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा : कलमाडी ता . शिंदखेडा येथील वादग्रस्त जमीन प्रकरणी शिरपूर उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे यांच्या अधिसूचनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत शिंदखेडा तहसीलदार सुनील सैंदाणे यांच्या आदेशाने तलाठी व मंडळाधिकाऱ्यांनी एकाच दिवसात फेरफारसह नोंदी प्रमाणित केल्या खरेदीची प्रक्रिया पार पाडली.यात वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान,सचोटी व कर्तव्यबजावणीत शिस्तभंग केल्या प्रकरणी तहसीलदार सैंदाणे यांच्यावरही निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव सादर झाला आहे.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नाशिक विभागीय आयुक्त रामकृष्ण गमे यांच्याकडे हा प्रस्ताव पाठविला आहे.

त्यामुळे तहसीलदार सुनिल सैंदाणे यांच्यावर कारवाई प्रस्तावित झाल्याने अत्यंत मनमानी पध्दतीने कामकाज करणाऱ्या शिंदखेडा येथील तहसिलदार यांच्यावर खरच कारवाई होईल काय ? असे परिसरातील यांच्यामुळे त्रस्त झालेल्या जनतेने आमच्या तरुण गर्जना प्रतिनिधीकडे प्रश्न उपस्थित केला आहे.

यापूर्वी देखील यांच्याबाबत बऱ्याचश्या तक्रारी झालेल्या असल्याने प्रकरण दाबले गेले . त्यामुळे जनतेच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिका - यांनी तलाठी एस.एस.पाटील व प्रभारी मंडळाधिकारी संजय जगताप यांना नुकतेच निलंबित केले आहे कलमाडी शिवारातील गट क्रमांक ६४ ही कुळकायद्याची शेतजमीन संगनमताने खरेदी विक्री व्यवहार नोंदविण्यास मदत केली,अशा आशयाची तक्रारदार राष्ट्रवादी काँग्रेसचे कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय बगदे यांनी केल्यानंतर संबंधितांवर कारवाई सुरू झाली आहे.

नवीन रेल्वे मार्ग बोरविहीर( ता .धुळे) ते नरडाणा (ता शिंदखेडा ) दरम्यानच्या कामासाठी भूसंपादन प्रस्तावानुसार सातबाऱ्यावर नवीन कोणत्याही नोंदी घेऊ नयेत व मालकी हक्कात कोणताही बदल करू नये,असा प्रांतांचा आदेश होता. तरीही संबंधितांनी ४० पट नजराणा भरून इतर हक्कातील नवीन अविभाज्य शर्त कमी करुन आदेशाचे उल्लंघन केले.अशा संशयास्पद कामकाजामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दोषींवर निलंबनाचे अस्त्र उपसले आहे. या प्रकरणी सहकार दुय्यम उपनिबंधक रडारवर आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध