Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, ३० जुलै, २०२२
Home
/
Unlabelled
/
बिरसा फायटर्स आदिवासी संघटना आक्रमक,आंदोलनाचा इशारा..! लता सोनवणे यांची आमदारकीची आदिवासी जात सिद्ध नाही,मग कुठल्या पात्रतेवर मंत्री पद मागता ?
बिरसा फायटर्स आदिवासी संघटना आक्रमक,आंदोलनाचा इशारा..! लता सोनवणे यांची आमदारकीची आदिवासी जात सिद्ध नाही,मग कुठल्या पात्रतेवर मंत्री पद मागता ?
कारणआमदार लता सोनवणे ह्या अनुसूचित जमातीच्या दाखल्यावर निवडून आल्या,त्यानंतर त्या अनुसूचित जमातीतील आहेत हे सिद्ध करू शकल्या नाहीत.त्यामुळे कुठल्या पात्रतेच्या आधारे त्यांना मंत्री करा, अशी मागणी केली जात आहे.असा सवाल महाराष्ट्रातील आदिवासी संघटना उपस्थित करत आहेत. मंत्री पद दिल्यास संपूर्ण आदिवासी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल,अशीही वाॅटसप व फेसबुक सारख्या सोशल मिडीयावर सुरू आहे.लता सोनवणे यांचा आदिवासी संघटनांतर्फे जोरदार विरोध सुरू आहे.
चोपडा विधानसभेचे आमदार लता सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याबाबतची तक्रार चोपड्याचे माजी आमदार जगदीश रमेश वळवी आणि अर्जूनसिंग दिवाणसिंग वसावे यांनी केली होती.नंदूरबार येथील जात पडताळणी समितीने चौकशी करून आमदार लता सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविले होते.
समितीच्या निर्णयाविरोधात लता सोनवणे यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात रीट याचिका दाखल केली होती.ही याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली आहे.
आमदार लता सोनवणे ह्या अनुसूचित जमातीच्या उमेदवार म्हणून चोपडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक आल्या होत्या.औरंगाबाद खंडपीठाने दिनांक 3 डिसेंबर 2020 ला समितीचा आदेश रद्दबातल करून आमदार लता सोनवणे यांना अमळनेरचे उपविभागीय अधिकारीकडून नव्याने जात प्रमाणपत्र प्राप्त करून सात दिवसांच्या आत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. दस्तावेज प्राप्त झाल्यानंतर कोर्टाने समितीकडे पाठवले.नवीन दस्तावेज दिसून आल्यामुळे समितीने ते दस्तावेज तपासणीसाठी पोलीस दक्षता पथकाकडे पाठवले होते.पोलीस दक्षता पथकाने तपास केला असता तिथे आमदार लता सोनवणे यांचे टोकरे कोळी जातीचेच असल्याचे सिद्ध करू शकल्या नाहीत.आमदार लता सोनवणे यांनी आदिवासी असल्याचे भासवून जातीचे अवैध प्रमाणपत्राच्या आधारे विधानसभा सदस्यत्व मिळवले आहेत. तसेच आजवर खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे शासनाची फसवणूक करून आमदारकीचे फायदे तसेच अनेक शासकीय योजनांचा,सोयी सुविधांचा लाभ घेतलेला आहे.
अशा वादग्रस्त आमदाराला मंत्री पद दिल्यास पदाचा दुरूपयोग होऊन आदिवासींचे अधिकार,हक्क,आरक्षण धोक्यात येऊ शकते.तसेच आपल्या नवीन मंत्रीमंडळाला सुद्धा कलंक लागू शकतो. म्हणून अशा वादग्रस्त आमदार लता सोनवणे यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करावेत,नवीन मंत्रीमंडळात स्थान देऊ नयेत,हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स तर्फे राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.याची नोंद घ्यावी,असे निवेदन बिरसा फायटर्स संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
साक्री तालुक्यातील शेणपूर गावालगत असलेल्या आदिवासी वसाहतीत विज वितरण कंपनीने विदयुत पुरवठा करुन लाईन उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनच...
-
शिरपूर प्रतिनिधी : एका गंभीर आणि चिंताजनक घटनेत, पेसा कायद्यांतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील स्थानिक नागरिक सध्या रामभरोसे सोडले गेल्याचे चित्र ...
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
शिरपूर प्रतिनिधी:प्रियदर्शनी मूकबधिर विद्यालय शिरपूर जिल्हा धुळे मुलांच्या शैक्षणिक,बौद्धिक विकास व करमणूक व्हावी या दृष्टिकोनाच्या हेतूने र...
-
शिरपूर : (प्रतिनिधी) शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आशितोष बहूद्देशिय संस्था शिरपूर संचलित प.पू.साने गुरुजी माध्य.वि...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा