Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २९ जुलै, २०२२

भोई समाज मदत केंद्राचे तसेच सर्व मदत करणाऱ्या दानशूर बांधवांचे मनापासून आभार



भोई समाज मदत केंद्र महाराष्ट्र
दि.20/6/2022 ला ग.भा.विमलताई प्रविणभाऊ हरसुले रा.पांढरी ता. अंजणगाव जि.अमरावती यांच्या घरी सात्वन भेट दिली होती.त्यावेळेस मदत केंद्र समन्वयक श्री.नंदूभाऊ धारपवार श्री.योगेशभाऊ मात्रे,दिलीपभाऊ श्रीनाथ,संजय सुरजूसे, संदिप कावनपुरे,आणि यांनी भेट देवून शहानिशा,केली असता दिसुन आले कि स्व.प्रविणभाऊ हरसुले हे परस्थिती ला वैतागुन व कर्जबाजारी झाल्यामुळे काही दिवसापुर्वी आत्महत्या केली. त्यांच्या कडे शेती नाही.घरची परिस्थिती खुपच वाईट आहे.
 
स्व.प्रविणभाऊ हरसुले यांच्या पश्चात त्यांची पत्नी गं.भां.विमलताई प्रविणभाऊ हरसुले मोठा मुलगा चि. प्रथमेश,हा दहावीत शिकत आहे, लहान मुलगा आयुष हा सहावीत शिकत असुन म्हातारी आई आहे.घरामध्ये कमवतं कोणीच नाही,उलट अंगावर अडीच लाखापर्यंत कर्ज आहे असे नातेवाईक सांगत होते.अशा या कठीण वेळेत त्यांना आर्थिक मदतीची अत्यंत गरज होती.

भोई समाज मदत केंद्र महाराष्ट्र मार्फत आज दिनांक 29 जुलै रोजी श्रीमती. विमलताई प्रविणभाऊ हरसुले यांना 20006 रुपये मदतीचा चेक देण्यात आला.यावेळी भोई समाज मदत केंद्र समन्वयक श्री.नंदूभाऊ धारपवार श्री. दिलीपभाऊ श्रीनाथ अंजणगाव सुर्जी श्री.योगेशभाऊ मात्रे दर्यापुर  
श्री रमेशभाऊ हरसुले श्री.तुकाराम गणेश श्रीनाथ श्रीमती दुर्गाताई धारपवार अमोल भिमराव बावने भोई समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी श्री नंदुभाऊ धारपवार यांनी नमूद केले की ही मदत संपुर्ण महाराष्ट्र मधून केली जात असून कोणत्याही एका संघटनेची नाही.

भोई समाज मदत केंद्राचे तसेच सर्व मदत करणाऱ्या दानशूर बांधवांचे मनापासून आभार


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध