Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १८ जुलै, २०२२
आस्थापनांना त्रैमासिक विवरणपत्र भरण्याचे आवाहन..!
नंदुरबार प्रतिनिधी दि.18 : सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र शासन व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये,निमशासकीय कार्यालये, महामंडळे,सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योग आस्थापना,व्यापारी, व्यावसायिक, कारखाने यांनी माहे एप्रिल,2022 ते माहे जून, 2022 कालावधीत कार्यरत मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ई-आर-1 दि.31 जुलै 2022 पर्यंत सादर करावे.
सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणारा) कायदा 1959 अनुसार वरील सर्व आस्थापनांनी मनुष्यबळाची त्रैमासिक विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. आस्थापनांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या
www.rojgar.mahaswayam.gov.in
या संकेतस्थळावर नियोक्ता या पर्यायावर क्लिक करुन आपला युझर आयडी व पासवर्डच्या सहाय्याने आपल्या आस्थापनेवरील कार्यरत मनुष्यबळाची माहिती भरावी.
यासंदर्भात काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,नंदुरबार मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टोकर तलाव रोड,तळ मजला रुम नं.27, नंदुरबार (दूरध्वनी क्रमांक 02564- 295801) येथे संपर्क साधावा, असे कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त वि.रा.रिसे यांनी कळविले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा