Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ६ जुलै, २०२२

तोरखेडा येथे संशयित बोगस डॉक्टरवर कारवाई गुलदस्त्यात ; बोगस डॉक्टरच्या शोधात आलेल्या पथकाची ओली पार्टीची चर्चा परीसरात चांगलीच रंगली



तोरखेडा : - बी. एस. मण्यार
वैद्यकीय अभ्यासक्रमाची पदवी न घेता. तसेच कोणत्याही वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी न करता बेकायदा पद्धतीने उपचार करणाऱ्या तोरखेडा येथील एका संशयित बोगस डॉक्टर विरोधात तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कारवाई गुलदस्त्यात ठेवली आहे. याबाबत सविस्तर वृत असे की, शहादा तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या बोगस डॉक्टरांची चलती चालू आहे. मात्र या बोगस डॉक्टरांन विरोधात अद्याप कोणतेही प्रकारे ठोस कारवाई करण्यात आली नाही.गेल्या चार ते पाच दिवसापूर्वी तोरखेडा (ता.शहादा) येथे एका संशयित बोगस डॉक्टरचा क्लिनिक वर जाऊन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र वळवी यांनी आपल्या पथकासह निशाणा साधला. व संबंधित डॉक्टरांकडून उपस्थित असलेला औषधसाठा ताब्यात घेत संबंधित डॉक्टरला आपल्याकडील वैद्यकीय प्रमाणपत्राचे आरोग्य विभागास पूर्तता करावी व आपले क्लिनिक चालू ठेवावे अशी माहिती देण्यात आली असल्याचे समजते. तसेच त्याच दिवशी परिसरातील काकर्दा भागातही बोगस डॉक्टर येत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती मिळालेली असल्याचे समजते. मात्र काकर्दा या गावी जाऊन तसे काही आढळूले नसल्याने तेथील डाव उकला. मात्र संध्याकाळची वेळ झाल्याने उपस्थित पथकाने ओली पार्टीच्या आनंद घेत तिथून काढता पाय घेतला सदर घटनेची माहिती परीसरात चर्चे नुसार पत्रकारांना मिळाली असून याप्रकरणी पत्रकारांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संबधीतांनी उडीचे उत्तर देत या प्रकारावर पर्दा टाकला आहे. मात्र या झालेल्या ओल्या पार्टीची सध्या परिसरात चांगले चर्चा रंगू लागली आहे. 

शासनाकडून वेळोवेळी बोगस डॉक्टर विरोधात कारवाईसाठी मोहीम राबविण्याबाबत सूचना दिल्या जातात. तरी देखील शहादा तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बोगस डॉक्टरांच्या तक्रारी काही कमी नाहीत.तसेच डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करतांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, महाराष्ट्र भारतीय चिकित्सा परिषद, महाराष्ट्र समचिकित्सा परिषद,तसेच महाराष्ट्र दंतवैद्यक परिषद या चार पैकी कोणत्याही परिषदेकडे आपली नोंदणी करणे आवश्यक असते. या परिषदांनी त्यासाठी मान्यता दिल्यानंतर  डॉक्टरांना आपला व्यवसाय सुरू करून रुग्णांची तपासणी करता येते. मात्र यापैकी एकाही परिषदेकडे नोंदणी न करता डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस सुरू केली जाते.कोरोनामुळे  जिल्हासह तालुक्यात संपूर्ण आरोग्य यंत्रणा गुंतलेली होती. 

त्याचा फायदा ग्रामीण भागातील बोगस डॉक्टरांनी उचलला. विशेषतः अशिक्षित जनतेचा गैरफायदा घेत या बोगस डॉक्टरांनी कोरोना काळात आपली पोळी भाजून घेतली. आता पुन्हा एकदा आरोग्य विभागाने सर्व तालुक्यांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, बोगस डॉक्टरवर कार्यवाही करण्यासाठी नियुक्त असलेली समिती केवळ कागदावरच असल्याचे दिसू लागली आहे. परिणामी अनेक निष्पाप रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. परीणामी या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. 

बनावट डिग्रीच्या आधारे तात्पुरता दवाखाना सुरू करून स्वस्तात उपचार करण्याचे आमिष त्यांच्याकडून दाखविले जाते. सर्दी, खोकला, तापावर औषधी दुकानात मिळणाऱ्या गोळ्या औषधांचा वापर करून या डॉक्टरांकडून उपचार केला जातो. त्यात रोगाचे निदान होत नसल्याने अनेकांना आपला नाहक जीव गमवावा लागत आहे.बोगस डॉक्टरकडून कोणत्याही आजारावर एकच उपचार पद्धत सुरू असल्याने किरकोळ आजारी असलेले रुग्णांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.आरोग्य विभागाकडून या डॉक्टरांवर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे.



1) चौकट :-

तोरखेडा येथे संबंधित संशयित बोगस डॉक्टरच्या क्लिनिक वर जाऊन त्याच्याकडील उपलब्ध असलेला औषध साठा ताब्यात घेण्यात आला आहे व संबंधित डॉक्टरला आपल्या कडील असलेले वैद्यकीय प्रमाणपत्रासह सत्यप्रती आमच्याकडे दाखल कराव्यात व नंतरच आपले क्लिनिक चालू करावे अशा सुचना दिल्या आहेत.

शहादा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र वळवी)

2 ) चौकट

अनेक वर्षा पासून तालुक्यात बोगस डॉक्टरांनी आपले बस्तान मांडले आहे. आरोग्य विभागाकडून नेमणुक झालेले आरोग्य सेवक ,डॉक्टर ,आरोग्य सेविका,यांच्या नेमनुकीचा ठिकाणी आठ - आठ दिवस गैरहजेरीत मुळे नागरीकांना आपल्या जीवाची पर्वा न करता या अशा बोगस डॉक्टरांकडून उपचार करण्यास भाग पाडले जाते.यामुळे गोर गरीब जनतेची दिशाभूल करत जीवनाशी खेळ खेळला जात आहे,आरोग्य विभागाने लक्ष देणे गरजेचे असून  बोगस डॉक्टर शोध मोहिम राबविली गेली पाहिजे आरोग्य आपल्या कर्मचाऱ्यांना निवासस्थानी थांबवणे बंधनकारक केले पाहिजे.मात्र निवासस्थानी कर्मचारी नसल्याने आरोग्य विभाग या डॉक्टरांवर कारवाई जाणून बुजुन दुर्लक्ष करीत आहे.

कृष्णा कोळी (सामाजिक कार्यकर्ते कमरावद ता.शहादा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध