Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ६ जुलै, २०२२

पानमसाला व सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या तस्करांचा सापळा रचून आवळल्या मुसक्या शिरपूर शहर पोलिसांची धडक कारवाई



शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई केली असता महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले पान मसाला सुगंधित सुपारीची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडून कारवाई करण्यात यश आले आहे.

मा.पोलीस अधिक्षक धुळे श्री. प्रविणकुमार पाटील सो.यांनी अवैध धंद्यांवर सक्त कारवाई करणे बाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख शिरपूर शहर पोलीस स्टेशन यांना मिळालेल्या गोपनिय माहिती नुसार त्यांच्या नेतृत्त्वाखाली दि.०५/०७/२०२२ रोजी मुंबई- आग्रा महामार्ग क्र. ०३ वरून मध्य प्रदेश राज्याकडून धुळे कडे एक तांबडया रंगाचे वाहन क्रमांक MH १८ BG ८६४७ हे जाणार असल्याच्या बातमीवरून शिरपूर टोलनाका येथे सापळा रचून १३.१० वाजेच्या सुमारास सदर वाहन थांबवून त्याची तपासणी केली असता, वाहनात सुगंधी वास आल्याने त्यातील चालकाकडे चौकशी केली असता वाहन चालकाने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने सदर वाहनात संशयीत माल असल्याचा संशय आल्याने सदर वाहन हे चालकासह पोलीस स्टेशनला आणून वाहनाची तपासणी केली असता त्यात एकूण ३०,८९,०००/- रुपये किंमतीची सुगंधी तंबाखू व पानमसाला वाहनासह मिळून आल्याने सदरचा मुद्देमाल ताब्यात घेऊन त्यांचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपरोक्त कामगिरी मा.प्रविणकुमार पाटील सो.पोलीस अधिक्षक धुळे, मा.प्रशांत बच्छाव सो.अप्पर पोलीस अधिक्षक धुळे,मा.प्रदीप मैराळे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मा.श्री. रविंद्र देशमुख पोलीस निरीक्षक शिरपूर शहर पोलीस स्टेशन,पोसई/संदीप मुरकूटे,पोकॉ/नरेंद्र शिंदे,पोकॉ/स्वप्निल बांगर,पोकॉ/अमित रनमळे अशांनी केली असून सदर तस्करांविरूध्द सोवत संतोष कृष्णा कांबळे सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग धुळे यांचे मागदशर्नाखाली किशोर हिंमतराव बाविस्कर अन्न सुरक्षा अधिकारी धुळे यांनी तक्रार दिलेली असून पुढील तपास पोसई/संदीप मुरकूटे हे करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध