Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १३ जुलै, २०२२
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील पूर सदृश्य परिस्थितीचा आढावाची मतदारसंघातील आमदार महोदयांना पडली आठवण....
साक्री तालुक्यातील पूर सदृश्य परिस्थितीचा आढावाची मतदारसंघातील आमदार महोदयांना पडली आठवण....
साक्री तालुक्यातील लोकप्रतिनिधी व कर्तव्यदक्ष आमदार सौ.मंजुळा गावित या नेमक्या कुठे आहेत ? गेल्या चार महिन्या भरापासून त्या मतदार संघात फिरकलेच नाहीत.साक्री तालुक्यातील गेल्या आठवड्याभरा पासून सततधार, ढगफुटी सदृश्य पाऊस पडत असल्याने तालुक्यातील सर्व नद्या व धरणे ही दुथडी भरून वाहत आहेत.साक्री तालुक्याचे तहसीलदार साहेब व धुळेचे जिल्हाधिकारी शर्मा यांनी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही दिला आहे.परंतु सततच्या पावसामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात मातीचा घरांची प्रचंड पडझड झाली आहेत व शेतीचेही अतोनात नुकसान झाले आहे.
तरी देखील असेअसतात प्रशासनाने किंवा लोकप्रतिनिधींनी कुठलाही पाहणी दौरा केलेला नाही.किंवा त्या विषयी दखल घेतलेली नाही. तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील गावांमध्ये भागात शेती पिकांचे पुराच्या पाण्याने अतोनात नुकसान झालेले आहे.
सुदैवाने या सर्व पूरग्रस्त परिस्थितीत कुठलीही जीवित हानी झालेली नाही.परंतु यावर अजूनही शासना मार्फत कुठलीही उपाययोजना राबविण्यात आलेली दिसून येत नाही. साक्री तालुक्यात गेल्या चार महिन्यापूर्वीच अनेक नवीन रस्त्याचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनांच्या अंतर्गत कामे झाली आहेत.त्यापैकी बऱ्याचश्या गावांचे रस्ते हे खड्डे सदृश्य झालेले आहेत आणि काही गावांची रस्ते तर पावसाच्या पाण्यात वाहून गेलेली आहेत तरीदेखील तालुक्यातील महसूल प्रशासनाने लवकरात लवकर ठोस पावले उचलून तालुक्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी करून व शेती पिकांचे आणि राहत्या घरांचा पडझडीचे पंचनामे त्वरित करावे. अन्यथा तालुक्यातील सामान्य जनता ही आमदारांना तालुक्यात फिरू देणार नाही असा सूचक इशाराही तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रसार माध्यमांनशी बोलताना दिला आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा