Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १४ जुलै, २०२२
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील अनेक गावामध्ये फक्त नावालाच म्हणजेच कागदावर आहेत संगणक परिचालक
साक्री तालुक्यातील अनेक गावामध्ये फक्त नावालाच म्हणजेच कागदावर आहेत संगणक परिचालक
महाराष्ट्र सरकारने प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये संगणक परीचालक नियुक्ती केली आहे.
ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कारभाराची माहिती अध्यावत करण्याबरोबरच ग्रामस्थांना ग्रामपंचायतीचा विविध सेवा देणे त्यांच्यावर बंधनकारक आहे परंतु अनेक ग्रामपंचायत तिथे संगणक परिचालक नावालाच असून महिन्यातून एखाद्या वेळेस हजर राहतात त्यांचे मानधनाचे ओझे ग्रामपंचायत वर लादले जात असून त्यांचा लहान ग्रामपंचायतीवर भार वाढत आहे
तालुक्यात ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे नेमणूक आहे त्यांना गावातील ग्रामस्थांना ग्रामविकास विभागाच्या ऑनलाईन सेवा देणे बंधनकारक आहे.
परंतु बहुतांशी ग्रामपंचायत ऑपरेटर महिन्यातून कधीतरी ग्रामपंचायतीत काम करताना दिसतात परंतु गावकऱ्यांना कोणत्या सेवा मिळत नाही आणि ग्रामपंचायतीची घरपट्टी पाणीपट्टी आणि स्वच्छता कर नागरिकांकडून वसूल करते याशिवाय त्यांच्याकडे उत्पन्नाचे दुसरे साधन नाही हा कर सुद्धा त्यांना वेळेवर मिळत नाही आजही लहान ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तीन तीन महिने पगार करू शकत नाही अशी अवस्था आहे 15 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून विकास कामांसाठी काही निधी मिळतो
त्यात सीएससी कंपनी महिन्याला बारा हजार तीनशे रुपये कपात करते आणि संगणक परिचालक करीता सात हजार रुपये अदा करते अनेक दिवस हा भार ग्रामपंचायतीवर वाढत असल्याने संगणक परिचालकांचे काम हे शालेय विद्यार्थ्यांना त्यांचा शालेय कामासाठी प्रत्येक
ग्रामपंचायतीचा ऑपरेटरला सेवा देणे बंधनकारक आहे.
ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामाचे नमुने ग्राम सॉफ्टवेअर मध्ये संगणीकृत करणे जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती स्तरावरील विविध प्रकल्पांबाबत आयोजित बैठक व प्रशिक्षणास उपस्थित राहून ग्रामसेवक व सरपंच,उपसरपंच यांना माहिती देणे.
ग्रामपंचायतीमार्फत ग्रामस्थांना देण्यात येणारे जन्म दाखला मृत्यू दाखला विवाह नोंद दाखला ना-हरकत दाखला मालमत्ता दाखला दारिद्र्य रेषेखालील दाखला घरबांधणी परवाना आदी दाखले ऑनलाईन देणे.
हे सर्व कामे ही या कक्षेत येतात
तरीही अनेक संगणक ऑपरेटर हे वेळेवर आपले कामकाज हे पूर्ण करीत नाहीत त्यामुळे अनेक
शासकीय योजनांचा बोजवारा होते आणि सामान्य लोकांपर्यंत त्या योजना पोहोचत नाहीत यांचे मुख्य कारण म्हणजे संगणक परीचालकांचा भोंगळ कारभार आहे असे तालुक्यातील अनके ग्रामपंचायतींची परिस्थिती आहे यावर शासनाने लवखरात लवखर योग्य ती पाऊले उचलून सामान्य जनतेस न्याय द्यावा
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
नाण्याला दोन बाजू आहेत दुसरी बाजू चा अभ्यास करूनच अश्या बातम्या द्याव्यात
उत्तर द्याहटवा