Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १४ जुलै, २०२२
Home
/
Unlabelled
/
औरंगाबाद येथे कु.नेहा प्रताप सरदार हिला न्यायमूर्ती ए.एम.खानविलकर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांच्या हस्ते पदवी प्रदान..!
औरंगाबाद येथे कु.नेहा प्रताप सरदार हिला न्यायमूर्ती ए.एम.खानविलकर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांच्या हस्ते पदवी प्रदान..!
शिरपूर प्रतिनिधी - औरंगाबाद येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ येथे दिनांक 9 जुलै रोजी रुक्मिणी हॉल एम.जी.एस कॅम्पस औरंगाबाद येथे कु. नेहा प्रताप सरदार हिला न्यायमूर्ती ए. एम.खानविलकर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली .
सदर दीक्षांत समारंभासाठी महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ औरंगाबाद 2022 येथे प्रमुख पाहुणे किरण रिजीजू कायदेमंत्री भारत सरकार, न्यायमूर्ती ए.एम खानविलकर न्यायाधीश सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, तथा चान्सलर महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ औरंगाबाद,ऋषिकेश रॉय न्यायमूर्ती सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता मुख्यन्यायाधीश हायकोर्ट मुंबई न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला न्यायाधीश मुंबई हायकोर्ट,डॉ.के.व्ही. एस.सरमा व्हॉइस चान्सलर,डॉ.अशोक वाडजे रजिस्टार तसेच विविध राज्यातील उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित होते.
प्रचंड जिद्दी,ध्येयवादी व आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न बघून ते पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेणारी शिरपूरचे ज्येष्ठ पत्रकार प्रताप सरदार यांची कन्या कु.नेहा प्रताप सरदार हिला शैक्षणिक वाटचालीसाठी तालुका घरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.सदर पदवी प्राप्त झाल्यानंतर नेहा सरदार हिचे अभिनंदन माजी शिक्षण मंत्री अमरीशभाई पटेल,जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे,आमदार काशीराम पावरा,उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष बबनराव चौधरी , माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण तसेच सामाजिक,राजकीय,पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील बंधू भगिनी यांनी अभिनंदन केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा