Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २४ ऑगस्ट, २०२२

शिंदखेडा येथील जनता हायस्कूलच्या 16 विद्यार्थ्यांचे एन.एम.एस.परीक्षेत यश व शिष्यवृत्तीस पात्र



शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी
येथील जनता हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एन.एम.एस. परीक्षेत घवघवीत यश संपादन करताना 17 पैकी 16 विद्यार्थ्यांनी 70 टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्य सह यश संपादन केले आहे म्हणून ते शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. सन-2021-22 ह्या शैक्षणिक वर्षात राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक ( एन.एम.एस. ) शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती.हया परीक्षेत येथील जनता हायस्कूलच्या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे. 

सदर परिक्षेसाठी शाळेतील 17 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 16 विद्यार्थ्यांनी 70 टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्य सह यश संपादन केले असून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाकडून इयत्ता बारावी पर्यंत 12 हजार प्रतिवर्षी शिष्यवृत्ती मिळणार आहे.या विद्यार्थ्यांना गायत्री माता प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक हरीष मोरे व जनता हायस्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका एस.एस.बैसाणे यांचे मार्गदर्शन लाभले होते. 

एन.एम.एस. परीक्षेत घवघवीत यशाचा तुरा उंचावणारे विद्यार्थ्यां व मार्गदर्शक शिक्षकांचा संस्थाध्यक्ष मनोहर गोरख पाटील,उपाध्यक्ष अमजद महेमुद कुरेशी,खजिनदार देवेंद्र पोपटराव बोरसे, सर्व संचालक मंडळ तसेच प्राचार्य एम.डी.बोरसे पर्यवेक्षक उमेश देसले सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी अभिनंदन केले आहे. 

विद्यार्थ्यां व शिक्षकांची जिद्द आणि चिकाटी ह्यामुळे शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी मदत होते विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक गुण रुजतात अशीच भागदौड कायम असू द्यावी त्यासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील राहणार असे संस्थाध्यक्ष मनोहर पाटील यांनी हयाप्रंसगी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध