Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २४ ऑगस्ट, २०२२

शिंदखेडा येथील वीर एकलव्य नगरात आदिवासी एकता परिषदेच्या पाठपुराव्यामुळे वीज वितरण कंपनीने बसविली डी.पी.



शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी येथील वरपाडे रोडवरील वीर एकलव्य नगरात गेल्या अनेक महिन्यांपासून डी.पी.नादुरुस्त अवस्थेत होती. वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता ह्याचा त्रास नेहमीच रहिवाशांना सहन करावा लागत होता.म्हणून आदिवासी एकता परिषदेच्या वतीने दि. 02-05-22 रोजी सहाय्यक अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण शाखा शिंदखेडा यांना नवीन डी.पी.बसविण्याची मागणी तालुका सचिव गुलाब सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली केली होती. 

अखेर आदिवासी एकता परिषदेच्या पाठपुराव्यामुळे आज नवीन डी.पी.बसविण्यास भाग पाडले. यशस्वीरित्या डी.पी.बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वार्ड क्रं 2 वीर एकलव्य नगरातील रहिवासी यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे व कर्मचारीचे आभार मानले आहेत त्याचप्रमाणे आदिवासी एकता परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे शक्य झाले म्हणून रहिवाशांनी समाधान व्यक्त करीत कौतुक केले आहे.

याप्रसंगी आदिवासी एकता परिषदेचे तालुका सचिव गुलाब सोनवणे, सहसचिव भुपेंद देवरे,सल्लागार आप्पा सोनवणे,सह सल्लागार शाम भाऊ सोनवणे,शंकर मोरे,सदस्य एकनाथ भिल,सुनील मोरे,आण्णा भिल,भरत भिल,आनंद सोनवणे,वसंत महाराज,पिरन भिल,विश्वास महाराज, अजय सोनवणे,जयेश सोनवणे आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध