Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १७ ऑगस्ट, २०२२
हर घर तिरंगा'; तांडा कुंडाणेतुन निघाली तब्बल 211 फुट लांब तिरंगा ध्वजाची रॅली
दिपक पवार धुळे प्रतिनिधी:
स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षांनिमित्त केंद्र सरकारने 'हर घर तिरंगा' उपक्रमाचे आयोजन केले आहे.या मोहिमे अंतर्गत मोठ्याप्रमाणावर कार्यक्रमांचे केंद्र सरकारने आयोजन केले आहे. यात आता नागरिक देखील हिरीरीने सहभागी होत आहे.
धुळेपासून जवळ असलेल्या तांडा कुंडाणे येथे माध्यमिक विद्यालय शाळेच्या वतीने आज सकाळी तब्बल 211 फूट लांब तिरंगा ध्वजाची रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.यात विद्यार्थी,पालक, शिक्षक यांच्यासह ग्रामस्थांनी उत्फूर्त सहभाग घेतला.
यावर्षी स्वातंत्र्यदिन भव्य पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. यासाठी ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ कार्यक्रमाअंतर्गत केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेचे आयोजन केले आहे.महाविद्यालयाने देखील या मोहिमेत भव्यदिव्य पद्धतीने सहभागी होण्याचा निर्धार केला .
या अनुषंगाने तब्बल 211फुट लांबीच्या तिरंगा ध्वजाची प्रभात फेरी काढण्याचे निश्चित करण्यात आले.
आज सकाळी महाविद्यालयाच्या आवारातून फेरीस सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी 211फुट लांबीचा झेंडा हातात उचलून धरत गावातून फेरी काढली. या अनोख्या फेरीत ग्रामस्थांनी देखील सहभाग घेतला.भारत माता की जय,हर घर तिरंगा अशा घोषणांचा जयघोष करत संपूर्ण गावातून ही फेरी काढण्यात आली. देशभक्तीची भावना विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये रुजविण्यासाठी ही रॅली काढण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.
श्री धनदाई माता बहुउद्देशीय शिक्षण संस्था अंचाडे अध्यक्ष श्री प्रा. डी.पी पाटील सर,मुख्याध्यापक.श्रीमती छाया पुंडलिक पाटील मॅडम व सर्व शिक्षक आणि आणि शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा