Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २ ऑगस्ट, २०२२

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील चिंचपाडा- बोदगाव-भोनगाव- आमोडे-झंझाळे - सामोडे या रस्त्याचे अतिशय निष्कृष्ट दर्जाचे काम सुरू



प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून चिंचपाडा -बोदगांव-भोनगांव-आमोडे-झंजाळे - सामोडे ह्या गावांना जोडणारा कोअर नेटवर्क रस्ता TR-20 कामाचे उद्दघाटन /डांबरीकरण व स्लॕबड्रेन व पाईपमोर्यांच्या बांधकामाचा समावेश असणार आहे.परंतु ठेकेदारामार्फत कामाची सुरुवात अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाली असुन माती मुरुम टाकुन केला जात आहे.ही खूप चुकीची काम करण्याची पद्धत ठेकेदाराची आहे असं करून शासनाची फसवणूक करणे हे अतिशय घातक आहे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांना शासन कोटी रुपयाचे नियोजन करते परंतु काम मात्र अतिशय निष्कृष्ट दर्जाचे करण्यात येते.संबंधित ठेकेदाराला आमोडे येथिल नागरिकांनी कामाबाबत विचारना केली असता  त्यांनी उडवा उडवीचे उत्तर देऊन दुरलक्षीत केले .सदर या संपूर्ण कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी  मा.ताईसो.संगिताताई गणेश गावित (पं.स.सदस्य साक्री)  दादासो.गणेश  गावित (सामाजिक कार्यकर्ते )व ग्रामस्थ कडुन केली जात आहे.तरी या प्रकारात दोषी असणाऱ्या वर कायदेशीर कारवाई करण्याचे गावकऱ्यांमधून बोलले जात आहे

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध