Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २ ऑगस्ट, २०२२

शिरपूरची कु. नेहा सरदार B.A.L.L.B.(Hons.) पदवीने सन्मानित ; भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते गौरव



शिरपूर प्रतिनिधी: येथील ज्येष्ठ पत्रकार प्रताप सरदार यांची कन्या कु. नेहा प्रताप सरदार हिने B.A.L.L.B.(Hons.) पदवी प्राप्त केली आहे. तिला औरंगाबाद येथे नुकतचे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ येथे दि 9 जुलै रोजी रुक्मिणी हॉल एम.जी.एस कॅम्पस औरंगाबाद येथे कु.नेहा प्रताप सरदार हिला न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया  यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.सदर दिक्षांत समारंभासाठी महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ औरंगाबाद 2022 येथे प्रमुख पाहुणे केंद्रीय कायदामंत्री ना.किरण रिजीजू भारत सरकार, न्यायमूर्ती ए.एम खानविलकर न्यायाधीश सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया,तथा चान्सलर महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ औरंगाबाद, ऋषिकेश रॉय न्यायमूर्ती सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया,न्यायमूर्ती दिपांकर दत्ता मुख्य न्यायाधिश हायकोर्ट मुंबई न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला न्यायाधीश मुंबई हायकोर्ट,डॉ.के.व्ही. एस.सरमा व्हॉइस चान्सलर,डॉ.अशोक वाडजे रजिस्टार तसेच विविध राज्यातील उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित होते. कु. नेहा प्रताप सरदार हिने B.A.L.L.B.(Hons.) पदवी प्राप्त केली. त्याबद्दल प्रताप सरदार यांचा निवासस्थानी जावुन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी सत्कार केला. यावेळी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील,प्रताप सरदार, भाजपा तालुका चिटणीस सुनिल चौधरी, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे,ओबीसी तालुकाध्यक्ष सतीश गुजर,भाजपा शिरपूर शहर चिटणीस राधेश्याम भोई,सुभाष राजपुत आदी उपस्थित होते. 

याप्रसंगी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी म्हणाले की,प्रताप सरदार यांची कन्या कु.नेहा प्रताप सरदार हिने प्रचंड जिद्दी,ध्येयवादी व आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न बघून ते पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेणारी तिचे जेवढे कौतुक केले ते कमीच असल्याचे सांगितले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध