Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारचा निषेध..!
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारचा निषेध..!
मुंबई प्रतिनिधी : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे.मात्र आजही विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. खाऊन खाऊन 50 खोके,माजलेत बोके माजलेत बोके,ईडी सरकारचे करायचे काय-खाली डोके वर पाय, अशा घोषणाबाजीने विधानभवनाचा परिसर दणाणून गेला.
घोषणाबाजी करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विशेषत: शिंदे गटातील आमदारांना डिवचण्याचा प्रयत्न केला. 50 खोके एकदम ओके अशा घोषणाबाजी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधक करीत असून पहिल्यापासूनच आक्रमक पवित्रा विरोधकांनी घेतला होता.50-50 बिस्कीट पुडे घेऊनही विरोधकांनी आंदोलन केले होते.हातात फलक घेऊन जोरजोरात घोषणाबाजी विधानभवनाच्या पायऱ्यांवर करण्यात आली.
आजही महाराष्ट्र के गद्दारोंको, जुते मारो,सालों को,
ओला दुष्काळ जाहीर करा, नाही तर खुर्च्या खाली करा,
अशा प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या.
काल सत्ताधारी विशेषत: शिंदे गटाचे आमदार आणि विरोधी पक्ष आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली होती.आज दोघांनीही घोषणाबाजी करत आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विरोधकांनी करत सरकारचा निषेध केला.राज्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले.मात्र मदत देणे तर दुरच मात्र केवळ राजकारण सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा