Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
आदिवासी विभागाचा बडा अधिकारी ‘एसीबी’ जाळ्यात..! 28 लाख रुपयांची लाच स्वीकारली...!
आदिवासी विभागाचा बडा अधिकारी ‘एसीबी’ जाळ्यात..! 28 लाख रुपयांची लाच स्वीकारली...!
नाशिक प्रतिनिधी:एसीबी अधिकाऱ्यांनी आदिवासी विभागाच्या एका बड्या अधिकाऱ्याला तब्बल 28 लाख रुपयांची लाच घेताना एसीबी अधिकाऱ्यांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात एसीबीने आदिवासी विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांना अटक केली आहे.बागुल यांनी सेंट्रल किचन बिल मंजुरीसाठी लाच मागितली होती. अखेर या प्रकरणी एसीबीने त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
अभियंता शिरपूर तालुक्यातील रहिवासी असून नाशिक शहरात उंटवाडी येथील नयनतारा या निवासस्थानी लाचेची रक्कम स्विकारताना एसीबीने अभियंताला ताब्यात घेतले आहे .
या अधिकाऱ्याची नाशिकमध्ये शेकडो कोटींची मालमत्ता असल्याचा संशय एसीबी अधिकाऱ्यांना आहे.
नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.या कारवाईत नाशिकच्या आदिवासी विकास विभागातील बांधकाम विभागाचे अभियंता दिनेकुमार बागुल यांना 28 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.दीड कोटी रुपयांचं बिल मंजूर करण्यासाठी या अधिकाऱ्याने बिलाच्या रकमेच्या 12 टक्के रक्कम लाच म्हणून मागितली होती. या अधिकाऱ्याने एका ठेकेदाराकडे लाच मागितली होती. अखेर या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित अभियंत्याकडून 28 लाखांची लाचेची रोख रक्कम जप्त केली आहे.
तब्बल 15 दिवस सापळा
संबंधित अधिकाऱ्याकडे नाशिकमध्ये कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचा संशय एसीबी अधिकाऱ्यांना आहे. तब्बल 15 दिवस एसीबी अधिकाऱ्यांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे. एसीबीने गेल्या दोन दिवसात अनेक कारवाई केल्या आहेत.त्यापैकी ही मोठी कारवाई मानली जात आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा