Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२
बोगस पटसंख्या दाखवून फसवणूक; लाटला पोषण आहार अन् पाठ्यपुस्तके
बोगस पटसंख्या दाखवून फसवणूक; लाटला पोषण आहार अन् पाठ्यपुस्तके
धुळे : शाळेत बोगस पटसंख्या दाखवून शालेय पोषण आहार,पाठ्यपुस्तके आणि स्वाध्याय पुस्तिका प्राप्त केल्या. त्या काळ्या बाजारात विक्रीतून शासनाची सव्वादोन लाखात फसवणूक केली.शहरातील जुने धुळ्यातील गुरुकन्हय्या प्राथमिक विद्या मंदिरात हा प्रकार घडला.याप्रकरणी शाळेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,खजिनदार, चिटणीस, मुख्याध्यापिकेविरुध्द गुन्हा दाखल झाला.
प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी आझादनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.जुने धुळे येथील गुरुकन्हय्या प्राथमिक विद्या मंदिर या शाळेचे अध्यक्ष अशोक बन्सीलाल कोटेचा, उपाध्यक्ष, खजिनदार, चिटणीस, उपचिटणीस (नावे माहीत नाही) व मुख्याध्यापिका रेखा बुधाजी चौधरी (रा. ग. नं. ५, माधवपुरा, धुळे) यांनी संगनमताने बोगस (Fraud) पटसंख्या दाखविली. तसेच पोषण आहार, पाठ्यपुस्तके व स्वाध्याय पुस्तिका शासनाकडून प्राप्त करुन त्या काळ्या बाजारात विक्रीतून शासनाची दोन लाख १९ हजार ५८१ रुपयांत फसवणूक केली. त्यामुळे संबंधित सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. जे. पावरा तपास करीत आहेत.
उर्दू शाळेकडूनही ३३ लाखाची फसवणूक
जिल्ह्यात २०११- २०१२ मध्ये जिल्ह्यातील शाळांची पटसंख्या पडताळणी झाली. तीत काही शाळांची पटसंख्या ५० टक्क्यांपेक्षा कमी आढळली. तरीही काही शाळांनी पोषण आहारासह विविध प्रकारचा लाभ घेतला. त्यानुसार त्यांना शिक्षण विभागाने नोटीस बजावली. त्यामुळे काही शाळांनी कागदपत्रे सादर केली, तर काहींनी रकमेचा भरणा केला. प्रतिसाद न देणाऱ्या शाळांवर फौजदारी कारवाईचा बडगा उचलला जात आहे. देवपूरमधील एका उर्दू शाळेनेही सुमारे ३३ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप असल्याने कारवाई केली जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने सांगितले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा