Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०२२

28 सप्टेंबर 2022 " माहिती अधिकार दिवस " साजरा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क संरक्षण संघटन कडून राज्यभर प्रत्येक जिल्हाधिकारी यांना स्थानिक कार्यकर्त्यांकडून निवेदन...



महाराष्ट्र राज्यात 28 सप्टेंबर रोजी अंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात यावा. यासाठी महाराष्ट्र शासनाने माहिती अधिकार दिन साजरा करण्याचे आदेश या पुर्वी ही दिले आहेत. परंतु त्या आदेशाचे अंमलबजावणी प्रशासन कडून फक्त कागदावरच केली जात आहे.
म. रा लोकसेवा हक्क संरक्षण संघटन मधील मा. पत्रकार, मा. माहिती अधिकार कार्यकर्ते व मा. सामाजिक कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रभर माहितीचा अधिकार व जनतेस सर्व कायद्याद्वारे प्राप्त अधिकार संबंधित कायद्याची जनजागृती, प्रचार व प्रसार करत असतात. महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय - केंमाअ - 2008/प्र. क्र. 378/08/ सहा. दिनांक - 20/9/2008. या शासन निर्णयानुसार "28 सप्टेंबर " हा दिवस आंतरराष्ट्रीय "माहिती अधिकार दिवस" म्हणून राज्यभर साजरा करण्यात यावा असा निर्णय शासनाने घेतला होता. या दिवशी स्पर्धा, निबंध, वकृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा तसेच व्याख्यानमाला " माहितीचा अधिकार " या विषयावर उपक्रम घेऊन सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये उपक्रम आयोजित करावेत तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते व इच्छुक गटांकरिता भित्तीपत्र, निबंध स्पर्धा, व्याख्यानमाला इ. आयोजित करून " माहिती अधिकार दिवस " म्हणून साजरा करून माहितीच्या अधिकाराबाबत समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती, प्रचार-प्रसार करून नागरिकांपर्यंत पोचविण्याहेतू शासनाने शासन निर्णय घेतला आहे व प्रत्येक जिल्ह्यात हा उपक्रम व्यापक पातळीवर राबवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
लोकसेवा हक्क संरक्षण संघटनेची दर रविवारी साप्ताहिक बैठक आयोजित करतो. दिनांक 04/09//2022 च्या बैठकीत "माहिती अधिकार दिवस" विषयी चर्चा झाली. यात प्रामुख्याने जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख, जनमाहिती अधिकारी, प्रथम अपीलीय अधिकारी आणि माहिती अधिकार कार्यकर्ते तसेच नागरिक यांच्यात चर्चासत्र आयोजित करावे. याबद्दल विवेचन झाले. या बैठकीत श्री. निलेश तोरवणे, श्री. शुभराज गजरे, श्री. सुरज कातोरे, श्री. विनोद बोरकर, श्रीमती. शबाना पठाण, श्रीमती. शोभा पाथरे, श्री. माधवराव दोरिक, श्री. सुरेन्द्र भदाणे, श्री दिपक पाचपुते व इतर मान्यवर उपस्थित होते. संघटनेच्यावतीने राज्यातील सर्व जिल्ह्यातील स्थानिक कार्यकर्त्यांकडून सर्व शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे व इतर शैक्षणिक संस्थामध्ये उपक्रम राबविणे कामी तसेच सर्व विभाग प्रमुख जन माहिती अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी व माहिती अधिकार कार्यकर्ते आणि नागरिक यांच्यात चर्चा सत्र आयोजित करून येत्या दिनांक - 28/9/2022 रोजी " माहिती अधिकार दिवस " साजरा करण्यात यावा असे निवेदन प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. 28 सप्टेंबर या दिवशी विद्यार्थी, महिला, शेतकरी, प्रत्येक जागरूक नागरिकाने कायद्या संबंधित माहिती व्यापक प्रमाणात प्रशासन स्तरावरून प्राप्त करून घ्यावी. तसेच माहिती अधिकार दिवस साजरा करण्यासाठी व कायद्याची जनजागृती तसेच प्रचार-प्रसार करण्याकामी सहकार्य, योगदान द्यावे. जर आपल्या जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात माहिती अधिकार दिवस प्रशासन स्तरावर साजरा होत नसल्यास सक्षम वरिष्ठ पातळीवर तक्रार दाखल करा. असे आवाहन श्री. निलेश तोरवणे. (संस्थापक, म. रा. लोकसेवा हक्क संरक्षण संघटन) यांनी केले आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध