Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०२२

शिंदखेडा शहरात मोठ्या उत्साहात गणरायाला अखेरचा निरोप..! अष्टविनायक गणेश मित्र मंडळातर्फे बालगोपाल व महिला वारकरी भजनी द्वारा मिरवणूक



शिंदखेडा: यादवराव सावंत प्रतिनिधी- येथील गेल्या दहा दिवसांपासून तब्बल वीस ते पंचवीस सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने गणरायाची स्थापना केली होती. बहुतांश घरगुती गणपती बाप्पा ची स्थापना देखील केली होती. शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.दहा दिवस बाप्पा पाहुणचार करुन आज अनंत चतुर्दशीला भाविकांना निरोप दिला.गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत होते. 

चाळीस वर्षांपासून गांधी चौकातील अष्टविनायक गणेश मित्र मंडळातर्फे गणरायाची स्थापना केली जाते ती सर्वात एकमेव जुनी परंपरा तरुणाईने कायम ठेवली आहे.विविध विषयांवर सांस्कृतिक कार्यक्रम, समाजोपयोगी उपक्रम,आकर्षक विद्युत रोषणाई, संदेश देणारे देखावे सादर करतात. ह्या वर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शहरातील आदर्श शिक्षक कृतज्ञता पुरस्कार सोहळा होतांना तब्बल 51 आदर्श शिक्षकांना गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे कैलास पर्वतावर शंकर महादेवाचे अवतरण आणि पिंडीवर जलाभिषेक हा भव्य दिव्य देखावा सादर केल्याने शहरातील भक्त भाविकांची अलोट गर्दी पाहावयास मिळाली.ही संकल्पना मंडळाचे प्रमुख अरुण देसले, हर्षल देसले, योगेश देसले, पंकज कौठळकर चेतन देसले राकेश देसले स्वप्निल देसले यांसह पदाधिकारी ची होती. 

विसर्जन मिरवणूक वारकरी संप्रदायाचे दिपक देशमुख व डॉ. विश्वासराव भामरे आणि महिला वारकरी संप्रदायाच्या रत्नाताई गुरव यांच्या नेतृत्वाखाली बालगोपाल व महिला वारकरी भजनी मंडळ द्वारा डिजे व इतर कर्कश आवाजाला तिलांजली देऊन एक अनोखा आदर्श समोर ठेवला.शहरातुन तसेच परिसरात कौतुक केले गेले. त्याचप्रमाणे टायगर गृप चा राजा ह्यांनी देखील बारा फुटांची श्री ची स्थापना केली होती विसर्जन देखील डोलताशा पथकाने केली.

साईलिला नगर,शिवबा राजे गणेश मित्र मंडळ,सुखकर्ता गणेश मित्र मंडळ,लालचंद नगर,केदारेश्वर मंदिर,माळी वाडा मारोती मंदिर गणेश मंडळांनी शांततेत विसर्जन मिरवणूक काढली.घरगुती गणपती बाप्पा ला देखील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनीही अखेरचा निरोप बुराई नदी व तापी नदीच्या पात्रात विसर्जन करण्यात आले.बी.के.देसले नगर यादवराव सावंत व सावंत परिवाराचा आकर्षक सजावट व संदेश देणारा गणराया विशेष आकर्षण ठरल्याने लयभारी गणपती बाप्पा सजावट स्पर्धेत सिलेक्ट झाला.नगरपंचायत मुख्याधिकारी प्रशांत बिडगर व पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांच्या नेतृत्वाखाली खबरदारी म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता. शिंदखेडा शहर हे शांतता एकोपा चे प्रतीक आहे हे शहरवासीयांनी सिद्ध केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध