Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२
अधिकृत टू व्हीलर शोरूम धारकांची यादी आरटीओ विभागाकडून प्राप्त
आमच्या प्रतिनिधीने: जिल्ह्यातील अधिकृत टू व्हीलर शोरूम धारकांची यादी परिवहन विभागाकडून प्राप्त केले आहे यात शिरपूर तालुका मध्येच जवळपास चार ते पाच अनाधिकृत टू व्हीलर शोरूम धारक असल्याचे स्पष्ट होते कारण सदर यादीमध्ये केवळ तीनच शोरूम अधिकृत आहे.
मग उर्वरित अनाधिकृत टू व्हीलर शोरूम धारक यांच्यावर परिवहन विभागाचे अधिकारी नेमके कधी कारवाई करणार? की अनधिकृत टू व्हीलर शोरूम धारकांवर बरोबर आपला देखील दसरा दिवाळी साजरा होण्याची वाट बघणार आहेत काय? असा प्रश्न आता नागरिकांना पडलेला आहे.
शिरपूर तालुक्यात तीनच अधिकृत शोरूम आहे.
मग शिरपूर शहरातील बजाज ऑटोमोबाईल,टीव्हीएस बाईक,होंडा ऑटोमोबाईल,हिरो ऑटोमोबाईल हे ऑथोराइज्ड सर्विस सेंटर या नावाखाली वाहनांची खरेदी विक्री करून आपला गोरख धंदा सर्रास करत आहेत.तर परिवहन विभागाने पुरवलेल्या यादीत सोनगीर नरडाणा येथे एकही अधिकृत टू व्हीलर शोरूमला परवानगी नाही.असे असताना सोनगीर येथील हिरो सद्गुरु मोटर्स, प्रगती होंडा सोनगीर तर नरडाणा येथील निर्मलाई मोटर्स हे बजाज गाडीचे शोरूम आहे.
या ठिकाणाहून सर्रास टू व्हीलर खरेदी विक्री केला जात असून देखील, परिवहन विभागाचे अधिकारी यांच्याकडे दुर्लक्ष का करीत आहे? मग त्या अधिकाऱ्यांचे नेमके यामागचे हित काय? जर जिल्ह्यातील परिवहन विभागाचे अधिकारी यांवर कारवाई करणारच नसेल तर या अधिकाऱ्यांबाबतची तक्रार परिवहन विभागाचे आयुक्तांकडे का करू नये? खरे तर या अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याबाबत शिस्त भंगाचीच कारवाई व्हावी. अशी तक्रारच परिवहन आयुक्तांकडे करण्याबाबत नागरिकांकडून जोर धरला जात आहे.
अॉथोराइज्ड सर्विस सेंटरमध्ये वाहन विक्रीचा परवाना आहे काय? या सर्विस सेंटर यांना विक्रीसाठीचे वाहने पुरविणारे अधिकृत टू व्हीलर शोरूम धारकांवर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावीत अशी वहानधारकांची मागणी होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा